आपल्या गायकीसाठी देशासह जगभरात ख्याती असणारे गायक पंकज उधास यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकज यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या निराळ्या गायकीने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. दीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते. त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
हे ही वाचा:
मनोज जरांगेंची माघार; आमरण उपोषण घेतले मागे
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
चिठ्ठी आई है आई है, ना कजरे की धार ना मोतियों के हार, आज फिर तुम पे प्यार आया है, चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल आदी लोकप्रिय गाण्यांमुळे पंकज उधास घराघरात पोहचले होते. भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उधास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.