23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापुणे पोलिसांनी ६० तासांच्या मोहिमेत अमली पदार्थांची तस्करी उधळली

पुणे पोलिसांनी ६० तासांच्या मोहिमेत अमली पदार्थांची तस्करी उधळली

Google News Follow

Related

पुणे पोलिसांनी तब्बल ६० तासांच्या विशेष मोहिमेत अमली पदार्थांची तस्करी उधळून लावली. अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. ड्रग्ज तस्करीची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीच्या ६० तासांची मोहीम अतिशय महत्त्वाची होती, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. “परिस्थितीची निकड लक्षात घेऊन, पुणे पोलिसांनी शहर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारी नेटवर्कला विस्कळीत आणि उद्ध्वस्त करण्यासाठी समन्वित उपाययोजनांची मालिका राबवून, पुरावे जलदगतीने एकत्रित केले,’ असे ते म्हणाले.

१९ फेब्रुवारी रोजी सोमवार पेठ येथे अमली पदार्थांचा बेकायदा व्यापार होणार असल्याची माहिती कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंखे यांना मिळाली होती. साळुंखे यांनी एका गाडीला अडवले आणि त्यातील संशयित वैभव माने याला ताब्यात घेतले. चौकशीत माने समाधानकारक उत्तरे देत नव्हता. तेव्हा त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल एक कोटी किमतीचे ५०० ग्रॅम एमडी आढळले.

माने आणि गाडीचा चालक असणारा अजय करोसिया यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्या बेकायदा अमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य अज्ञातांचाही पत्ता लागला. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळपर्यंत पोलिसांनी विश्रांतवाडी येथील गोदामावर छापा टाकून ५५ किलो एमडी जप्त केले आणि हैदर शेख याला अटक केली.

शेख यांच्या मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना एमडीचे उत्पादन होत असलेल्या कारखान्यांची छायाचित्रे आढळली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एमआयडीसी कुरकुंभ येथील कारखान्यावर छापा टाकून एक हजार ३२७ कोटी किमतीचे ६६४ किलो एमडी जप्त केले. पोलिसांनी या कारखान्याचा मालक भिमाजी साबळे याला अटक केली आहे. त्यानंतर या कारखान्याला तांत्रिक मदत पुरवणाऱ्या युवराज भुजबळबाबत पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला त्याच दिवशी मुंबईतून अटक केली.

हे ही वाचा:

“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”

रशिया-युक्रेन युद्धात सुरतच्या तरुणाचा मृत्यू

प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन

भुजबळ आणि साबळे यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा येथे उत्पादित होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील अमली पदार्थांची तस्करी दिल्लीला आणि अन्य देशांत केली जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांचे पथक लगेचच विमान पकडून दिल्लीला गेले आणि त्यांनी दोन दुकानांवर छापा टाकून तीन संशयित आणि ९७० किलो एमडी जप्त केले. या प्रकरणी पुणे शहरात अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा