24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या

२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या

Google News Follow

Related

सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी, यांसह अन्य मागण्या केंद्र सरकारकडून मान्य होईपर्यंत ‘दिल्ली चलो’ आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. हजारो शेतकरी पंजाब-हरयाणा सीमेजवळील शिबिरात सहभागी झाले आहेत. तर, पंतप्रधान मोदी यांनी जे काही शेतकऱ्यांबाबत घडतेय, त्यावेळी बोलावे, असे आवाहन शेतकरीनेते सरवन सिंग पंधेर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलन २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केले असून शंभू आणि खनौरी सीमेजवळ त्यांनी अनेक कार्यकर्मांचे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ शनिवारी येथे मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारीपासून दिल्ली आणि हरयाणा राज्यांदरम्याच्या सिंघू आणि टिकरी सीमा बंद करण्यात आल्या होत्या, त्या काही अंशी खुल्या करण्यात आल्या आहेत.

“आज शंभू आणि खनौरी येथील मोर्चाचा १३वा दिवस आहे. आज जागतिक व्यापार संघटनेवर चर्चा होणार असल्याने दोन्ही सीमांवर आमची बैठक होईल. शेती क्षेत्राला जागतिक व्यापारी संघटनेमधून बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांसोबत जे काही घडतेय त्यावर बोलायला आम्ही पंतप्रधान मोदींना सांगत आहोत,’ असे पंधेर म्हणाले.

२१ फेब्रुवारीला खनौरी येथे झालेल्या चकमकीत २१ वर्षीय शुभकरनचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश पंजाब सरकारने द्यावेत, या मागणीवर शेतकरी नेते ठाम असल्याने त्याच्यावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा चर्चेसाठी सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार करून तोडगा काढण्यासाठी चर्चेचे आवाहन केले.

हे ही वाचा:

सुलतानने राज नाव धारण करत हिंदू मुलीला फसवले!

दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता

विमान जमिनीवर उतरताना पायलटच्या डोळ्यांत शिरली लेझर किरणे

दंगलीत नुकसान करणाऱ्या बदमाशांकडून वसुलीसाठी कायदा!

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता शेतकऱ्यांनी दर्शविली. ‘देशात शांतता कायम राहावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही नेहमीच चर्चा केली आहे आणि यापुढेही तोडगा काढण्यासाठी आम्ही असे करू. आम्ही सर्व सूचनांचेही स्वागत करतो. मला आशा आहे की, आम्ही या विषयावर पुढेही चर्चा करू. भारत सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी समर्पित आहे,’ असे मंत्री म्हणाले.

रविवारी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातील. सोमवारी जागतिक व्यापार संघटना आणि केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाईल. २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्याशी संबंधित मंचांच्या बैठका देशभरात होणार आहेत आणि २८ फेब्रुवारी रोजी दोन्ही संघटनांची सामायिक बैठक होणार आहे. यात शेतकरी नेते सहभागी होतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा