माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची उमेदवारी मिळाली.यानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडही झाली.भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पक्षासाठी अहोरात्र काम करणार असल्याचे म्हणाले होते.दरम्यान, अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये भाजपासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाले होते की, पक्षाकडून जसे आदेश येतील त्यानुसार आम्ही काम करू.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे काही काम सांगितले जाईल ते काम करू, अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.त्यानुसार अशोक चव्हाण यांनी पक्षासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (२४ फेब्रुवारी) नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.यातील बहुसंख्य माजी महापालिका सदस्य हे काँग्रेस पक्षात होते.
हे ही वाचा:
देशातील सर्वात लांब केबल पुल ‘सुदर्शन सेतू’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन!
दंगलीत नुकसान करणाऱ्या बदमाशांकडून वसुलीसाठी कायदा!
भाजपची तमिळनाडूमध्ये कमाल कामगिरी!
पाच वर्षांच्या मुलाची उच्च न्यायालयात जनहित याचिका!
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis… pic.twitter.com/LvkQOQGYGm
— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 24, 2024
याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर माहिती दिली.अशोकी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो.
या पक्षप्रवेशानंतर चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी साधला.ते म्हणाले की, आज नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.ही लोकं माझ्याबरोबर होते. आम्ही एकत्रितपणे या सर्वांना निवडून आणले होते. त्यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार त्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.