27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषविमान जमिनीवर उतरताना पायलटच्या डोळ्यांत शिरली लेझर किरणे

विमान जमिनीवर उतरताना पायलटच्या डोळ्यांत शिरली लेझर किरणे

वैमानिकाच्या डोळ्यांपुढे अंधःकार

Google News Follow

Related

बेंगळुरूहन कोलकाता येथे येणारे इंडिगोचे विमान जमिनीवर उतरत असतानाच कॉकपिटमध्ये लेझरची तीव्र किरणे घुसल्याची घटना नुकतीच घडली. जमिनीवर उतरताना केवळ एक किलोमीटरचे अंतर असताना ही घटना घडली. यामुळे क्षणभर वैमानिकाच्या डोळ्यापुढे अंधःकार पसरला. या घटनेमुळे वैमानिक आणि विमान वाहतूक कंपन्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लेझर किरणे परावर्तित करून विमान सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिधाननगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ही घटना घडली तेव्हा विमानात १६५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. इंडिगोचे विमान ६ई २२३चा वैमानिक शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता विमान जमिनीवर उतरवण्याच्या तयारीतच होता. तेव्हा कैखाली भागात कुठेतरी जवळ त्याच्या डोळ्यांपुढे लेझर किरणे आली. विमान धावपट्टीवर सुमारे १५०० ते २००० फूट प्रति मिनिट वेगाने उतरत असताना या लेझर किरणांमुळे वैमानिकाच्या डोळ्यांपुढे क्षणभर अंधारी आली. अशा महत्त्वाच्या क्षणी जरासुद्धा लक्ष विचलित होणे, त्रासदायक ठरू शकते, असे विमान वाहतूक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान जमिनीवर उतरताना अशाप्रकारे अडथळा आल्यास, वैमानिक लँडिंग रद्द करून माघारी परतण्याचा पर्याय वैमानिकांपुढे असतो.

हे ही वाचा:

पाच वर्षांच्या मुलाची उच्च न्यायालयात जनहित याचिका!

दंगलीत नुकसान करणाऱ्या बदमाशांकडून वसुलीसाठी कायदा!

भाजपची तमिळनाडूमध्ये कमाल कामगिरी!

आरबीआयकडून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना पीपीआय जारी करण्याची बँकांना परवानगी

या प्रकरणी नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगिले. लेझर किरणांची समस्या आणि त्यामुळे विमानांना होणारा धोका हा मुद्दा गेल्याच आठवड्यात झालेल्या विमानतळ पर्यावरणीय व्यवस्थापन समितीसमोर मांडण्यात आला. त्यावेळी प. बंगालच्या गृहसचिव नंदिनी चक्रवर्ती यादेखील उपस्थित होत्या. लेझर किरणांमुळे वैमानिकांना विमान वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून नागरी हवाई वाहतूक नियामक प्राधिकरण असणाऱ्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाच्या १८.५ किमी त्रिज्येच्या परिसरात लेझर किरणांना मज्जाव केला आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यातच बिधाननगर शहर पोलिस ठाण्याने एका आयोजकांना त्यांच्या हद्दीत ड्रोन आणि रात्री लेझर किरणांचे प्रदर्शन करण्यास बंदी घातली होती. मात्र हे निर्देश नववर्ष पार्ट्यांनिमित्त देण्यात आले होते. मात्र आता ही बंदी लग्नसोहळा आणि अन्य सणांच्या बाबतही आणण्याची गरज या ताज्या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. खरे तर, बिधाननगर पोलिसांची हद्द ही संपूर्ण रेड झोनमध्ये येते. येथे संपूर्ण वर्षभरच लेझर किरणे आणि ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे. सणउत्सवाच्या काळात धावपट्टीवर उतरणाऱ्या अनेक वैमानिकांनी लेझर किरणे कॉकपिटमध्ये घुसत असल्याने लँडिंग करण्यात अडथळा येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा