पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेला तृणमूल काँग्रेस नेता शाहजहान शेख याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.शाहजहान शेख अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
केंद्रीय एजन्सी ईडीने शाहजहान शेख याच्यावर मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला आहे.जमीन बळकावल्याच्या आरोपाखाली मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी शेख शाहजहानशी संबंधित असलेल्या पश्चिम बंगालमधील एका व्यावसायिकाच्या जागेवर छापा टाकला.शाहजहान शेखच्या हावडा येथील निवासस्थानी आणि संदेशखाली येथील इतर ठिकाणी देखील ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!
रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरन सिंहच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची भरपाई!
दरम्यान, रेशन घोटाळा संदर्भात ५ जानेवारी रोजी शाहजहान शेखच्या परिसराची झाडाझडती घेण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर त्याच्याशी संबंधित जमावाने हल्ला चढवला.या हल्ल्यात अनेक ईडीचे अधिकारी जखमी देखील झाले.यानंतर तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख फरार आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तसेच संदेशखाली येथील महिलांनी शाहजहान आणि त्याच्या समर्थकांवर जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक अत्याचार आरोप केला.शाहजहान शेखच्या अटकेसाठी संदेशखालीत महिलांकडून जोरदार आंदोलन सुरु असून पोलिसांनी पोलिसही त्याच्या मागावर आहेत.