राजस्थानमधील कोटामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब बनली आहे. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी येथील आणखी एका विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू झाला आहे.
गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह जवळच्या जंगलात आढळला आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. रचित सोंधिया असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जेईई परीक्षेची तयारी करत होता. ११ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. कोचिंग सेंटरला जाण्यासाठी तो हॉस्टेलच्या बाहेर पडला होता. मात्र तिथपासून तो कोणालाच दिसला नाही.
गार्दिया महादेव मंदिराजवळच्या जंगल परिसरात तो जात असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसत आहे. मंदिर परिसरात तो टॅक्सी घेताना दिसत आहे आणि जंगल परिसरात तो प्रवेश करतो आहे. तिथेच त्याला शेवटचे पाहिले गेले. पोलिसांनी सोंधियाच्या खोलीची तपासणी केली असता त्यांना तिथे एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आपला मंदिरात जाण्याचा विचार असल्याचे नमूद केले होते.
हे ही वाचा:
संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक
भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला उपग्रह
‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’
अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई
सोंधियाची बॅग, मोबाइल फोन, खोलीची चावी आणि अन्य वस्तू मंदिर परिसराजवळ पोलिसांना सापडल्या होत्या. या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. पोलिसांनी एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण केले होते. हा मुलगा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. सोधिया गेल्या एक वर्षाहून अधिक काळ या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करत होता.