पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर प्रदेशात पोहोचले. यावेळी त्यांनी श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली. यासोबतच पंतप्रधान मोदी आज लखनऊमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.श्री कल्की धाम मंदिराची उभारणी श्री कल्की धाम मंदिर ट्रस्टकडून केली जात आहे.या मंदिर ट्रस्टीच्या अध्यक्षपदी अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम हे आहेत.या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक संत, धर्मगुरू व इतर मान्यवर सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”
माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन
भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय
काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण
संभलमधील हिंदू तीर्थक्षेत्र कल्की धामच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. श्री कल्की धाम हे देशभरातील भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विटरवर पोस्टकरून म्हटले होते.त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री कल्की धाम मंदिर पायाभरणी सोहळा पार पडला.तसेच पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.श्री कल्की धाम मंदिर ट्रस्टची अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम आहेत.आचार्य प्रमोद कृष्णम यांना नुकतेच काँग्रेस पक्षाने कारवाई करत पक्षातून काढून टाकले होते.