माजी मंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ऍड. रजनी सातव यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवार, १८ फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वस्थ असल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऍड. रजनी सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या.
राज्यमंत्री राहिलेल्या रजनी सातव यांनी एकदा विधानसभेत तर एकदा विधानपरिषदेतून नेतृत्व केलं होतं. रजनी सातव या १९८० ते ९० कळमनुरीतून विधानसभेत तर १९९४ ते २००० या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या.
हे ही वाचा:
भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय
काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण
संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!
कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…
काँग्रेसच्या प्रदेश संघटनेतही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या. सातव कुटुंबिय गेल्या ४३ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. सध्या त्यांची सून आमदार आहे. गांधी घरण्याचे निकटवर्तीय, अशी सातव कुटुंबियांची ओळख आहे. रजनी सातव यांच्या मागे स्नुषा आमदार डॉ. प्रज्ञा सातव, दोन नातवंडे असा परिवार आहे.