राजस्थानमध्ये हिजाबवरून सुरू असलेला गदारोळ अद्याप शांत झालेला नाही.यावरून पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला आहे.जोधपूर ग्रामीण भागातील पिपर येथे हिजाबवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले.पिपर या भागात असणाऱ्या शासकीय उच्च माध्यमिक शाळा क्रमांक-२ मध्ये शिकणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनीं हिजाब घालून शाळेत येत होत्या.यावर शाळा प्रशासनाकडून या विद्यार्थिनींना शाळेचा गणवेश परिधान करून येणाचे आदेश दिले.शाळेच्या या आदेशावर विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेत येऊन शनिवारी गोंधळ घातला.वाढता गोंधळ पाहून शाळेत पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक रामकिशोर सांखला म्हणाले की, आम्ही विद्यार्थिनींना फक्त सरकारने ठरवून दिलेल्या शाळेच्या ड्रेस कोडमध्ये येण्यास सांगितले होते. यावर एका विशिष्ट समाजाचे लोक येथे आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.यावेळी नगरसेवक मुझफ्फर खलिफा आणि पालिका उपाध्यक्षांचे पती हे देखील सोबत होते आणि त्यांनी मुख्याध्यापकांकडून मार्गदर्शक तत्त्वे विचारण्यास सुरुवात केली, असे शाळेचे मुख्याध्यापक रामकिशोर सांखला यांनी सांगितले.
हे ही वाचा:
काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण
नव्या जोशात काम करा, पुढचे १०० दिवस महत्त्वाचे!
योगी आदित्यनाथ लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर!
अमित शहा गरजले…विरोधी पक्षांच्या नेत्यांचे काम आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवणे!
मुलांच्या पालकांचा वाढता गोंधळ पाहून अखेर पोलिसांना याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले, असे मुख्याध्यापक यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, शाळेत आलेल्या कुटुंबीयांनी वाद घातला आणि म्हणाले की, सरकार आज आहे,उद्या नसेल. मात्र, शिक्षक हे सारखेच असतात.याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्यांनी दिली.पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण शांत झाल्याचे त्यांनी सांगितले.