सर्व भारतीयांना शतकानूशतकांच्या संघर्षानंतर तमाम भारतीयांना प्रभू श्री रामाचे मंदिर मिळाले. त्या प्रमाणेच पुण्याला पुण्येश्वर मंदिर मिळाले पाहिजे. इथे सुरु असणारी लव्ह जिहादसारखी प्रकरणे थांबली पाहिजेत, पुण्याला सुरक्षित शहर करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांनी केले. पुण्यात नमो बाईक रॅलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा..
फसवणुकीप्रकरणी ट्रम्प यांना ३५ कोटी डॉलरचा दंड
आर अश्विनची तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार
सागरी क्षेपणास्त्र, इंधनवाहू विमाने ताफ्यात
देवधर म्हणाले, पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे यासाठी आमचा लढा सुरु राहणार आहे. हा प्रश्न केवळ एका मंदिराचा नाही तर कट्टरपंथी मानसिकतेचा आहे. आम्हाला हवे ते करू. पुरातन मंदिरावर दर्गा बांधू. कोणीही आमचे काहीही बिघडवू शकत नाही अशा मुजोरी मानसिकतेला वेसण घालावेच लागेल. जागोजागी अनधिकृत प्रार्थनास्थळे निर्माण होतात. अशा ठिकाणी देशविघातक कृत्ये करण्यासाठी षडयंत्र केली जातात. याला वेळीच अटकाव केला नाही तर पुण्यात कोंढव्यासारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्येश्वर मंदिर परत मिळणे हा पुणेकरांचा अधिकार आहे. पुणे सुरक्षित झाल्याशिवाय विकसित आणि समृध्द होऊ शकत नाही, असेही देवधर म्हणाले.
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या नमो बाईक रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुण या रॅलीमध्ये भगवे फेटे आणि भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाही दिल्या. शहरातील प्रमुख मार्गावरून ही बाईक रॅली काढण्यात आली.