पंजाब- हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणाचे सब इन्स्पेक्टर हिरालाल असे या पोलिसाचे नाव आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतीत वृत्त दिले आहे. हिरालाल हे ५२ वर्षांचे होते
हिरालाल यांना शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आलं होतं. शंभू बॉर्डर ही पंजाबमधील पटियाला येथे आहे. सब इन्स्पेक्टर हिरालाल हे हरियाणाच्या सीमावर्ती भागात तैनात होते. कर्तव्यावर असताना सब इन्स्पेक्टर हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हिल रूग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान हिरालाल यांचा मृत्यू झाला.
हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांनी सब इन्स्पेक्टर हिरालाल यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. कपूर म्हणाले, हिरालाल यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक बजावलं आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाचं मोठं नुकसान झालं आहे.
हे ही वाचा:
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!
अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे
आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!
दरम्यान, शंभू बॉर्डरवर एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे. शंभू बॉर्डरवर मित्रांसोबत ट्रॉलीमध्ये झोपलेल्या ७८ वर्षीय ज्ञानसिंह यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या रुग्णवाहिकेतून पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. येथून डॉक्टरांनी त्यांना पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.