23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव खेळून झाला असून आता इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने विक्रम रचला आहे.

इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करत अश्विन याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा पल्ला गाठणारा तो जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. भारतीय माजी गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत ६१९ विकेट्स आहेत.

रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकरवी झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का ८९ धावांवर दिला. अश्विनची कसोटीतील ही ५०० वी विकेट ठरली. हा आकडा गाठणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. सर्वात जलद ५०० विकेट घेणारा भारतीय होण्याच्या बाबतीत अश्विन याने अनिल कुंबळे याला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने आपल्या १०५ व्या कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला. अश्विनने आपल्या ९८ व्या कसोटीत ही कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर ८०० कसोटी बळी आहेत.

हे ही वाचा:

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल स्वीकारला

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन- ८०० 
  • शेन वॉर्न- ७०८
  • जेम्स अँडरसन- ६९६
  • अनिल कुंबळे- ६१९ 
  • स्टुअर्ट ब्रॉड- ६०४
  • ग्लेन मॅकग्रा- ५६३
  • कोर्टनी वॉल्श- ५१९
  • नॅथन लायन- ५१७
  • रविचंद्रन अश्विन- ५००
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा