विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली.राहुल नार्वेकर यांनीदोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप नोंदवत आरोप केले.विरोधकांच्या आरोपावर राहुल नार्वेकर यांनी उत्तर देत म्हणाले की, ज्यांना टेंथ शेड्युलबद्दल (१० वी सूची) काही माहितचं नाही तीच लोकं आरोप करू शकतात.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, माझा समोर ज्या अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या, त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर केलेल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आम्ही आज प्रोनाउन्स केलेली आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रोनाउन्स केली आहे.ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईड लाइन्स आणि अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत, त्या सर्वांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला आहे.देण्यात आलेला निर्णय हा अगदी सुस्पष्ट आहे.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा नाही!
हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण
फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका
ते पुढे म्हणाले, मी हा निर्णय देताना जी कारणे दिली आहेत ती कायदेशीर पटण्यायोग्य आहेत.त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझा निर्णयात दिली आहे.विरोधकांच्या आरोपावर राहुल नार्वेकर म्हणाले की, ज्या लोकांना टेंथ शेड्युलबद्दल (१० वी सूची) काही माहितीच नाही तीच लोकं अशी काहीतरी कॉमेंट( आरोप) करू शकतात, मीरीटवर ही लोकं काहीच बोलू शकत नाहीत.त्या लोकांनी डिसेन्ट आणि डीफेक्शन यातील फरक सांगावा.अशा गोष्टींवर न बोलता, मुद्दा सोडून इतर गोष्टी बोलतात, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य यांच्याकडून राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आले.यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे सर्व महान लोक आहेत, घटनातज्ज्ञ आहेत.या महान लोकांच्या टिप्पणीवर मला काही उत्तर द्यायचे नाही.त्यांच्या टिप्पणीला उत्तर द्यायला मी स्वतःला सीमित समजतो, असे राहुल नार्वेकर म्हणाले.