नाशिक मध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणून ओळख असणारे बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.बबन घोलप गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे चित्र होते.अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात आल्याने बबन घोलप नाराज झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, बबन घोलप हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बबन घोलप यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.बबन घोलप हे माजी मंत्री असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.
हे ही वाचा:
इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!
काँग्रेसने सत्तेत असताना एमएसपीचा फॉर्म्युला नाकारला होता अन् आता देणार कायदेशीर हमी
मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर
हल्दवानी हिंसाचारातील सूत्रधार अब्दुल मलिकसह नऊ आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
बबन घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.मात्र, भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात आल्याने घोलप यांचे चित्र बदलले.ठाकरे गटातून निघून गेलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येता काम नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.तसेच मला अमरावती किंवा शिर्डीपैकी एका जागेची निवड करायला सांगितले होते.त्यानुसार मी शिर्डीची निवड करत तयारीलाही सुरुवात केली.मात्र, भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा ठाकरे गटात घेतल्याने मी उपनेतेपदाचा राजीनामा देत आहे, असे बबन घोलप यांनी म्हटले होते.अखेर बबनराव घोलप हे ठाकरे गटातून बाहेर पडले असून शिवसेना शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.