28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषइंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!

इंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!

मुलांना भीक मागायला लावल्याप्रकरणी आईवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

स्वतःच्या मुलांना भीक मागायला लावल्या प्रकरणी इंदूरमधील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंद्राबाई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिने एक जमीन, दोन मजली घर, एक मोटारसायकल, २०,००० रुपये किमतीचा स्मार्टफोन आणि सहा आठवड्यात २.५ लाख रुपये भीक मागून कमावले आहेत.ही सर्व संपत्ती तिने आपल्या मुलांना भीक मागायला लावून कमावले आहे.मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावल्याप्रकरणी आरोपी इंद्राबाई महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची सोमवारी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेच्या एका मुलीला एनजीओमध्ये ठेवण्यात आले आहे.उपाशी राहण्यापेक्षा भीक मागणे पसंत केल्याचे महिलेने सांगितले.चोरी करण्यापेक्षा भीक मागणे चांगले असल्याचे इंद्राबाई या महिलेने सांगितले.भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी इंदूर महापालिकेसोबत काम करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे.ही संस्था इंदूरच्या ३८ प्रमुख चौकांमधून सुमारे ७,००० भिकाऱ्यांची माहिती गोळा करत आहे.या आकडेवारीत ५० टक्के मुले आहेत.एनजीओ स्वयंसेविका रुपाली जैन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, एका अंदाजानुसार एकत्रितपणे हे भिकारी भीक मागून सुमारे २० कोटी रुपये इतके कमावतात.

हे ही वाचा:

वक्फच्या वादग्रस्त मालमत्तेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर

‘आयपीएल’ला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने फटकारले

अशोक चव्हाणांनी ‘कमळ’ हाती घेतले

बनावट हलाल सर्टिफिकेट देणाऱ्यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने आवळल्या मुसक्या

ताब्यात घेण्यात आलेल्या इंद्राबाईला सात वर्षांच्या मुलाशिवाय १०, ८, ३ आणि २ वर्ष वयोगटातील इतर चार मुले आहेत.ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ आहे त्या ठिकाणी ती महिला आपल्या मुलांना भीक मागण्यास उभे करते.या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांकडून पैसे मागणीसाठी हे लोक तो मार्ग निवडायचे.त्यामुळे मुलांना आणि महिलांना पळवून लावणे अवघड व्हायचे.

या संदर्भात अटक करण्यात आलेल्या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला.तेव्हा तिने सांगितले की, महाकाल मंदिराच्या निर्मितीनंतर कमाई वाढली आहे.महाकाल मंदिराच्या निर्मितीपूर्वी २,५०० इतकी भाविकांची संख्या होती आणि आता दररोज १.७५ लाख दर्शनाला येत असतात, महिलेच्या जबाबानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.इंद्राने ४५ दिवसांत २.५ लाख रुपये कमावल्याचे उघड झाले.तिने पोलिसांना सांगितले की, राजस्थानमधील कोटाजवळ एक दोन मजली घर आणि शेतजमीन आहे.तसेच एक चांगला स्मार्टफोनही ती वापरते आणि तिचा पती मोटारसायकलवरून फिरतो.ही सर्व मालमत्ता भिकमागून कमावली आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा