आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरच्या माजी आमदार शहनाज गनई यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.यापूर्वी शहनाज गनई या फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाशी (NC) संबंधित होत्या.
भाजप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम यांच्या उपस्थितीत माजी आमदार शहनाज गनई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.शहनाज गनई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या केंद्र सरकारने लोकांसाठी खूप चांगले काम केले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या ‘ सबका साथ, सबका विकास ‘ या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्याचे गनई यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सरफराज खान याचे कसोटी पदार्पण निश्चित
इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर वीज कोसळली
हिल्द्वानीमध्ये हिंसाचारानंतर ५०० कुटुंबांनी सोडले घर
नीतीश कुमार यांच्यासाठी संकटमोचक ठरले गृहमंत्री अमित शहा!
आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत गनई म्हणाल्या की , “आम्ही पंतप्रधान मोदींसाठी हॅट्ट्रिक (विजय) सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करू”.गनई यांनी बदलत्या जम्मू काश्मीरचे कौतुक केले.पाकिस्तानी सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे कोणीही धाडस करत नाही आणि तेथील लोक शांततेने राहतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे, त्या पुढे म्हणाल्या. शहनाज गनई यांचे वडील गुलाम अहमद गनई हे जम्मू-काश्मीरमध्ये मंत्री होते.
दरम्यान, शहनाज गनई या अनेक वर्षांपासून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सदस्य नव्हत्या, असे एनसीने स्पष्टीकरण दिले आहे.शेनाज गनई यांनी २०२० मध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सोडला, असे जेकेएनसी नेते इम्रान नबी दार यांनी सांगितले.