अकोला शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक मोठी घटना समोर आली आहे. अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज सकाळी नवजात अर्भक आढळून एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून काही अंतरावर आहे.
अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात ही जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे.हे ठिकाण गजबजलेलं आणि वर्दळीचं आहे.घडले असे की, आज ( ११ फेब्रुवारी ) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रतनलाल प्लॉट चौकात असलेल्या जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या मैदानात मुले क्रिकेट खेळात होती.त्याच दरम्यान त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला.चेंडू काढण्यासाठी मुले शाळेच्या छतावर गेली असता त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आले.
हे ही वाचा:
हमास बोगदा थेट गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाखाली सापडला
ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित
श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरातील गाभारे १८ दिवस बंद
उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!
मुलांनी घाबरून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्भक चार ते पाच महिन्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.हे अर्भक शाळेच्या छतावर कसे आले? याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.