रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. या मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येत असतात. जर तुम्ही हरिहरेश्वर येथे दर्शनाला येणार असाल, तर ही बातमी अवश्य वाचा. श्री क्षेत्र हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप विधी व मंदिरातील दुरुस्तीसाठी १८ दिवस बंद राहणार आहेत.
१५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत मंदिरातील श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार आहेत. या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्शनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. या काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठारहेही वाचा :
एबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी
मेडिकलच्या विद्यार्थांना रील्स केल्याबद्दल दंड
सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार
मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याने अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पूजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील होणारे मरणोत्तर दिवसकार्य, अस्थीविसर्जन, पिंडदान या संबंधित इतर कामे चालू राहतील, अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.