25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनियानिवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

निवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

२६६ सदस्यीय नॅशनल असेंब्ली (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मधील काही जागांचा अद्याप निकाल जाहीर होणे बाकी आहे

Google News Follow

Related

इम्रान खानच्या पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि इतर पक्षांच्या समर्थकांनी सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धीम्या गतीने होणारी मतमोजणी आणि कथित हेराफेरीच्या विरोधात शनिवारी देशव्यापी निदर्शने केली.
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. मात्र स्पष्ट विजय न मिळूनही पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजयाचा दावा केला आणि त्यांचा पक्ष ‘सर्वांत मोठा पक्ष’ असल्याचे जाहीर केले. तथापि, त्यांच्याकडे बहुमत नसल्याचे मान्य करत त्यांनी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांना आमंत्रित केले. त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही विजयाचा दावा केला आणि ते सरकार स्थापन करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात आले.

इम्रान खान यांचे वकील म्हणून काम करणारे, पीटीआयचे अध्यक्ष गोहर अली खान यांनी पाकिस्तानमधील सर्व संस्थांनी नागरिकांचा आदेशाचा आदर केला पाहिजे. तुरुंगात असलेले इम्रान खान देशाचा पुढचा पंतप्रधान ठरवतील, असे नमूद केले. तसेच, शनिवारी रात्रीपर्यंत निवडणूक निकाल जाहीर न झाल्यास पीटीआय रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने करेल, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या मते, पीटीआयने पाठिंबा दिलेल्या स्वतंत्र उमेदवारांनी आश्चर्यजनक कामगिरी करून १००हून अधिक जागा जिंकल्या. शरीफ यांच्या पीएमएल-एनपेक्षा त्यांनी ७२ जागा जिंकल्या. हत्या झालेल्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) ५४ जागा जिंकल्या. त्यातील बहुतांश जागा त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंध प्रांतात आहेत. इतर लहान पक्षांनी एकत्रित २७ जागा जिंकल्याचे पाकिस्तान निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आघाडी सरकार स्थापन झाल्यास ते सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.

गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपल्यापासून ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही २६६ सदस्यीय नॅशनल असेंब्ली (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मधील काही जागांचा अद्याप निकाल जाहीर होणे बाकी आहे. तांत्रिक बिघाड, इंटरनेट सेवा खंडित होणे आणि तुरळक दहशतवादी हल्ले यामुळे मतमोजणी विस्कळीत झाली आहे.

इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआयसाठी, निवडणूक निकाल महत्त्वपूर्ण होते कारण निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणुकीद्वारे पक्षाला त्यांच्या निवडणूक चिन्हाखाली निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पीएमएल-एन आणि पीपीपीने आघाडी सरकारसाठी जोरदार चर्चा केली असून पाकिस्तान त्रिशंकू संसदेकडे वाटचाल करत आहे.

हे ही वाचा:

 मेडिकलच्या विद्यार्थांना रील्स केल्याबद्दल दंड

‘भारत जोडो यात्रे’ला वेळेआधीच विराम मिळण्याची चिन्हे

एबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी

अश्विनने उधळली बुमराहवर स्तुतीसुमने!

पीटीआय-समर्थित अपक्षांचा सिंहाचा वाटा असूनही, ते पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यानुसार सरकार बनवू शकत नाहीत. त्यांनी पक्षात सामील होऊन सरकार स्थापन करावे लागेल. पीटीआय, पीपीपी आणि पीएमएल-एन यांनी त्यांच्या मतदारसंघात कथित हेराफेरीबद्दल वेगवेगळ्या न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. पक्षांनी दावा केला आहे की, ज्या उमेदवारांना आधी विजयी घोषित करण्यात आले होते त्यांना नंतर पराभूत म्हणून जाहीर करण्यात आले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांनी निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘अराजकता आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणातून पुढे जाण्यासाठी देशाला स्थिर सरकारची गरज आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले. तर, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि फसवणूक झाल्याच्या दाव्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे. देशात सुरळीत लोकशाही प्रक्रिया चालवण्यासाठी या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा