22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामा“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”

“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

Google News Follow

Related

माजी नगरसेवक अभिजित घोसाळकर यांची दहिसर येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. एका तरुण नेत्याचे अशाप्रकारे निधन होणे हे गंभीर आहे. या घटनेला काही लोक राजकीय रंग देत आहेत, ते योग्य नाही. घटना गंभीर असली तरी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले आहेत. वर्षानुवर्ष ते दोघे एकत्र काम करत होते. पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या का घातल्या? आणि त्यानंतर स्वतःवरही गोळीबार केला. याची चौकशी सुरू आहे. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील,” अशी भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

या गंभीर घटनेवरून राजकारण करू नये आणि या घटनेवरून राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर आता सदर बंदुकीचा परवाना घेतला होता का? परवाना नसताना ती बंदूक आली कुठून? तसेच इतरवेळी परवाना देताना कोणती काळजी घेतली पाहीजे, याचा आढावा घेतला जाईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा..

हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

बंगालच्या तुरुंगातील कैदी राहताहेत गर्भवती; १९६ बालकांचा जन्म

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

फर्रुखाबादमधील रशीय मिया मकबरा पूर्वी शिव मंदिर होते?

दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी ही राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यातही घटना गंभीर आहेच. त्यामुळे राजीनामा मागितला म्हणून मला आश्चर्य वाटत नाही. विरोधी पक्षालाही हत्या का झाली याचे कारण माहीत आहे, असे स्पष्टीकारण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा