मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस भाई याने फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख हा घटनास्थळी उपस्थित होता. तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस भाई याने केला होता. या गोळीबारापूर्वी फेसबूक लाईव्ह करण्यात आलं होतं, त्यावेळी मॉरिस याने मेहुल इज हिअर, असं म्हटलं होतं. त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती, हे स्पष्ट झालं होतं. गोळीबाराच्या या घटननंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आलं. मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे देखील मिळाली आहेत.
गोळीबार करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखला रात्रीच ताब्यात घेतले आहे. सोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? हत्या करण्याचे कारण काय? घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वाद होता का? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हे ही वाचा:
‘सगळीकडून दगडफेक होत होती; घरात लपवून वाचवला जीव’
‘आर्टिकल ३७०’ हटविल्याचा थरार लवकरच मोठ्या पडद्यावर!
भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!
चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून मॉरिस याच्या विरोधात कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली असून, ही परदेशी बनावटीची पिस्तूल आहे. विशेष म्हणजे मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता, असे लक्षात आले आहे. एमएचबी पोलिसांकडून हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.