28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाघोसाळकर गोळीबार : १० दिवसांपूर्वी मौरीसच्या पोस्टचा संबंध काय ?

घोसाळकर गोळीबार : १० दिवसांपूर्वी मौरीसच्या पोस्टचा संबंध काय ?

दोन वर्षांपूर्वी नोरोन्हाला अटक झाली होती त्याबाबतही पोलीस तपास करत आहेत

Google News Follow

Related

दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर कथित गोळीबाराच्या अवघ्या १० दिवसांपूर्वी मौरिस नोरोन्हा याने फेसबुकवर एक चित्तथरारक पोस्ट टाकली होती. “तुम्ही अशा माणसाला पराभूत करू शकत नाही ज्याला वेदना, नुकसान, अनादर, हृदयविकार आणि नकार याची पर्वा नाही.” मौरीसने टाकलेल्या या पोस्ट टाकण्यामागे काय कारण होते ? गुरुवारी घडलेल्या घटनेशी या पोस्टचा सबंध आहे याचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!

भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

आपकडून आसाममध्ये तीन उमेदवार जाहीर

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

समर्थकांमध्ये मौरीस भाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या नोरोन्हा याने गुरुवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर सुमारे ४ गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा देखील मृत्यू झाला.

२९ जानेवारी रोजी, गोळीबाराच्या फक्त १० दिवसांपूर्वी, नोरोन्हाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता, फोटोखाली त्याने लिहिले होते “तुम्ही अशा माणसाला पराभूत करू शकत नाही ज्याला वेदना, नुकसान, अनादर, हृदयविकार आणि नकार याची पर्वा नाही.” इन्स्टाग्रामवरील या पोस्टशी गुरूवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.

मौरीस नोरोन्हा बोरिवली परिसरात एक स्वयंसेवी संस्था चालवत होता आणि स्थानिक राजकीय वर्तुळात स्वयंघोषित नेता होता. त्यांच्या फेसबुक खात्यावर त्याने नोरोन्हा हा पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता आहे, मौरिस भाई मुंबई आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या ठिकाणांना भेट देतात, असे म्हटले होते. मौरिस नोरोन्हा आणि त्यांच्या कार्याबद्दल त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे वर्णन “परोपकारी, समाजसेवक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक माणूस” असे केले होते.

मौरिस याच्या विरोधात २०२२ मध्ये एका विवाहित महिलेने एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात बलात्कार, ब्लॅकमेलिंग, धमकावणे, फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
या महिलेच्या म्हणण्यानुसार मौरीस याने २०१४ मध्ये तिची फसवणूक करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात मौरीस नोरोन्हा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळी तो अमेरिकेत होता.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुक आउट नोटिस जारी केली होती. भारतात येताच त्याला विमानतळावर अटक करण्यात आली होती. या सर्व प्रकरणामागे अभिषेक घोसाळकर असल्याचा संशय मौरीसला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा