27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाफेसबुक लाइव्हनंतर गोळीबार; ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

फेसबुक लाइव्हनंतर गोळीबार; ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

वैमनस्यातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्ह दरम्यान गोळीबार करण्यात आल्याची घटना दहिसर येथे घडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर हे मौरिस नोरोन्हा उर्फ मौरिस भाई याच्यासोबत फेसबुक लाइव्ह करत होते. मौरिस नोरोन्हा याने फेसबुक लाइव्ह सुरू असताना तो उठला आणि त्याने घोसाळकर यांच्यावर तीनवेळा गोळ्या झाडल्या. त्यानंतर मौरिसभाईने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार, मौरिस नोरोन्हा हा बोरिवली पश्चिमेकडील रहिवासी असून तो स्वतःला समाजसेवक म्हणवतो. त्याचा यंदा निवडणूक लढवण्याचा विचार होता, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विविध राजकीय नेत्यांसोबत त्याची छायाचित्रे आढळून आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर आणि मौरिस नोरोन्हा यांची कार्यालये शेजार-शेजारी आहेत. स्थानिक पक्षांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून त्यांच्यात संघर्ष सुरू होता, असे स्थानिकांनी सांगितले.

अशी एखादी घटना घडली की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा मागण्याची पद्धत गेल्या काही दिवसात रूढ झाली आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘महाराष्ट्रात गुंडा राज अवतरले आहे. अभिषेक घोसाळकर याची हत्या करणारा मौरिस नोरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. तेथे त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मौरिस याला शिंदे गटात येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. गृहमंत्री म्हणून फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा,’ असे ट्वीट ‘एक्स’वर केले आहे.

हे ही वाचा:

‘आर्टिकल ३७०’ हटविल्याचा थरार लवकरच मोठ्या पडद्यावर!

भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!

नुकतेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यातच गोळीबार गेला होता. ते एकमेकांविरोधात एका जमिनीच्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पोलिस ठाण्यात जमले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा