बोरीवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील मेट्रो मॉलच्या बाजूने जाणारा टाटा स्टील मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर बहुतांश गटारांची झाकणेच गायब आहेत. या मार्गावर भरपूर प्रमाणात ऑफिसेस असल्यामुळे मोठी वर्दळ या मार्गावर असते. रस्त्याच्या कडेला अनेक गटारांची झाकणे गायब आहेत किंवा ती अर्धवट लावली असल्याने रात्रीच्या वेळेस चालत जाताना एखादा व्यक्ती या गटारात पडून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
रात्रीच्या वेळेस या मार्गावर अंधार असतो, त्यामुळे हे खड्डे दिसत नाहीत. दुचाकीची पार्किंग असल्याने हे खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे एखादा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडू शकतो. या मार्गावर भर रस्त्यात एका खड्ड्याच्या बाजूला खड्डा कळावं, या उद्देशाने कुंड्या लावण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
रजिया सुलतानच्या काळात बांधण्यात आलेली ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त!
पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंगांचे कौतुक!
पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींनी पुन्हा जात काढली
भरपूर प्रमाणात बांधकाने सुरू असल्याने मोठमोठे ट्रक या मार्गावर उभे असतात, त्यामुळे खड्डा वाहनचालकांना न दिसल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या खड्ड्याभोवती छान कुंड्यांची आरास करून सुशोभिकरण करण्यात आले आहे, असे चित्र दिसते. या गटारांवर पालिकेने तातडीने एखादा अपघात होण्याआधी झाकणे बसवावीत, अशी मागणी होत आहे.