27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषनरेंद्र मोदींची जात काढणाऱ्या राहुल गांधींची झाली पोलखोल

नरेंद्र मोदींची जात काढणाऱ्या राहुल गांधींची झाली पोलखोल

२००० च्या केंद्र सरकारच्या आदेशाने तेली साहू आणि तेली राठोड यांना तेली आणि घांची समानार्थी म्हणून घोषित केले

Google News Follow

Related

लोकसभा तसेच राज्यसभेत केलेल्या भाषणातून काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केल्यामुळे बिथरलेल्या राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रेच्या दरम्यान मोदींच्या जातीवरून आरोप केले. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या जातीबद्दल खोटे बोलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. १९९४ मध्ये गुजरातमध्ये ओबीसी म्हणून सूचीबद्ध केलेल्या जातींपैकी पंतप्रधान मोदी यांची जात मोध घांची अशी होती असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा जन्म ओबीसी वर्गात झालेला नाही असे ते म्हणाले. पण राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची नंतर पोलखोल झाली आहे.

राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी हे तेली ‘सवर्ण’ मोद घांची कुटुंबात जन्मलेले आहेत. ते ओबीसी समाजातील नाहीत. त्यांच्या पक्षाच्या सरकारने २००० मध्ये त्यांची जात ओबीसी म्हणून समाविष्ट केली. २५ जुलै १९९४ रोजी गुजरात सरकारच्या समाजकल्याण विभागाने एक ठराव जारी केला आणि त्यानुसार ३६ जातींना ओबीसी म्हणून वर्गीकृत केले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोध-घांची या जातीचा समावेश आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे १९९४ मध्ये गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री छबिलदास मेहता यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार होते. कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोध-घांची या जातीसह ३६ जातींचा समावेश हा ओबीसीमध्ये करण्यात आला. याचा उल्लेख राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक केलेला नाही किंवा त्यांना त्यांच्या सहकार्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली नाही.

हेही वाचा..

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

फर्रुखाबादमधील रशीय मिया मकबरा पूर्वी शिव मंदिर होते?

पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंगांचे कौतुक!

रजिया सुलतानच्या काळात बांधण्यात आलेली ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त!

 

मंडल आयोगाच्या अहवालानंतर व्हीपी सिंह सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण देण्यात आले होते हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वी फक्त एससी आणि एसटी आरक्षणासाठी पात्र होते. मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर इतर जातींना ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा ट्रेंड सुरू झाला.  २००० च्या केंद्र सरकारच्या आदेशाने तेली साहू आणि तेली राठोड यांना तेली आणि घांची समानार्थी म्हणून घोषित केले असताना १९९४ मध्ये गुजरात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना मोधी-घांची जातीचा ओबीसी म्हणून समावेश करणे अधिसूचित केले गेले.

अशाप्रकारे, ओबीसी यादीत कोणत्याही जातीचा समावेश किंवा वगळण्यात नरेंद्र मोदी यांची भूमिका नव्हती आणि राहुल गांधी खोटे बोलत आहेत आणि जनतेची दिशाभूल करत आहेत, हे स्पष्ट होते.  पंतप्रधान मोदींना त्यांच्या जातीय पार्श्वभूमीवरून लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये काँग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल यांनी एनडीएचे तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या जातीवरून हल्ला केला होता. ज्या पद्धतीने आज राहुल गांधी तसे आरोप करत आहेत. मात्र, जनतेने नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे जातिय हल्ले नाकारले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने ऐतिहासिक जनादेश दिला.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही जात जनगणना होऊ देणार नाहीत कारण त्यांचा जन्म हा ओबीसी समाजात झालेला नसून त्यांचा जन्म खुल्या प्रवर्गात झाला आहे. पंतप्रधान मोदी हे म्हणाले की या देशात दोनच जाती आहेत त्या म्हणजे गरीब आणि श्रीमंत. आता त्यांनी ते कोणत्या जातीत आहेत हे स्पष्ट करावे. ते गरीब असू शकत नाहीत कारण ते लाखो रुपये किमतीचे पोशाख परिधान करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा