24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील घटना

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.देशात सार्वत्रिक निवडणूक पार पडत असताना आज गुरुवारी (८ फेब्रुवारी) दुपारी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या मोबाईल व्हॅनला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवला आणि नंतर पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार ज्यामध्ये ५ पोलिसांचा मृत्यू झाला.

७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात दोन ठिकाणी स्फोट झाला होता.या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर आज फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आणि २ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांनी आयईडी स्फोटकाचा वापर करून पोलिसांचे वाहन उडवून टाकले आणि पोलिसांवर ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत गोळीबार केला.या स्फोटकाने अक्षरशः वाहनाचे तुकडे झाले.पाकिस्तानमध्ये बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे सरकारकडून अद्याप मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

फर्रुखाबादमधील रशीय मिया मकबरा पूर्वी शिव मंदिर होते?

पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंगांचे कौतुक!

गौतम अदानींचे पुनरागमन; १०० अब्ज डॉलर क्लबच्या यादीत मारली उसळी

रजिया सुलतानच्या काळात बांधण्यात आलेली ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त!

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी ८ वाजता सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.मोठ्या संख्येने लोक मतदान करत असल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत देशभरातील एकूण १२,८५,८५,७६० मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा