अयोध्येत राम मंदिर निर्माणानंतर न्यायालयाकडून ज्ञानवापी येथील व्यास तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी देण्याचेही निर्देश देण्यात आले. यानंतर आता ज्ञानवापी सारखे एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे असलेला रशीय मिया मकबरा हे एक शिव मंदिर होते का? असा दावा करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर त्या जागेचा सर्व्हे करण्यात आला असून याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
फर्रुखाबादमधील कायमगंज तहसीलच्या रशिदाबाद येथे असलेल्या रशीद मिया यांचा शेकडो वर्षे जुना मकबरा शिव मंदिर असल्याचा दावा करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या हा मकबरा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. न्यायालयाच्या आदेशावरून या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले.
कायमगंज शहरातील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ते प्रदीप सक्सेना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पुरातत्व विभागाला नोटीस देऊन रशिदाबाद गावात असलेला मकबरा शिव मंदिर असल्याचा दावा केला. तसेच मकबरा येथे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. हे शिव मंदिर होते, मुघल आक्रमकांनी उध्वस्त करून मकबरा बांधला, असा दावा सक्सेना यांनी केला आहे.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
‘श्रीकृष्णाने पाच गावे मागितली होती, आम्ही तीन मागतो’
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामाराम
मऊ नामक भागातील रशिदाबाद येथे असलेल्या या मकबरापूर्वी तेथे प्राचीन काळातील गंगेश्वरनाथ शिव मंदिर होते. सन १६०७ मध्ये मुघलांनी ते पाडले होते. या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मियाँ) यांचा मकबरा बांधण्यात आला. जुन्या शिव मंदिराची मूळ रचना बदलण्यात आली नसून मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते, ते बाजूला करून त्याच ठिकाणी मकबरा बनवण्यात आला. प्रदीप सक्सेना यांनी याबाबत एक याचिका न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, रशीद मियां मकबरा येथे हिंदू प्रतिके आढळून येतात, असा दावाही करण्यात आला आहे.