उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी विधानसभेत अयोध्येतील ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याबाबत भाष्य करताना काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त ठिकाणांबाबत भाष्य केले. योगी आदित्यनाथ यांचा मथुरा आणि काशीचा संदर्भ अयोध्या राममंदिरातील बालकराम मूर्तीच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या महिनाभरात आला आहे.
‘अयोध्या दीपोत्सवाचे आयोजन करणे हा माझा आणि माझ्या सरकारचा विशेषाधिकार आहे, जो एक राष्ट्रीय उत्सव ठरला. अयोध्या शहराला पूर्वीच्या सरकारांनी मनाई आणि संचारबंदीच्या कक्षेत आणले होते. शतकानुशतके अयोध्येला कुहेतूने शाप देण्यात आला होता. त्याला नियोजित तिरस्काराचा सामना करावा लागला. सार्वजनिक भावनांप्रति क्रूर वागणूक देण्यात आली, कदाचित अशी कुठेही पाहिली गेली नसेल. अयोध्येला अन्यायाचा सामना करावा लागला,’ असे योगी म्हणाले.
मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर परिसर या दोन अन्य वादग्रस्त जमिनी आहेत, ज्यावर हिंदू दावा करत आहेत. ‘मी जेव्हा अन्यायाबाबत बोलतो, तेव्हा आम्हाला पाच हजार वर्षे जुनी गोष्ट आठवते. त्यावेळी पांडवांवरही अन्याय झाला होता… अयोध्या, काशी आणि मथुरासोबतही असेच घडले होते…,” असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘तेव्हा कृष्ण कौरवांकडे गेला होता आणि म्हणाला होता, तेव्हा आम्हाला केवळ पाच गावे द्या, तुमच्याकडे असलेली सर्व जमीन ठेवा. आम्ही आनंदाने तिथे राहू. कृष्णाने पाच गावे मागितली होती. त्यावेळी कृष्णा करारासाठी गेला होता. त्याने अर्धा का होईना न्याय मागितला होता. पण इथे शेकडो वर्षांपासून समाज आणि त्याची श्रद्धा तीन, केवळ तीनच गावांबाबत बोलत आहे,’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. हे बोलताना त्यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसी येथील ठिकाणांकडे लक्ष वेधले. ‘ती तीन ठिकाणे विशेष आहेत, ती सामान्य नाहीत. ती ईश्वराच्या अवताराची ठिकाणे आहेत,’ असे ते म्हणाले. अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान मानले जाते, तर मथुरा हे कृष्णाचे जन्मस्थान मानले जाते. वाराणसीतील ज्ञानवापी स्थळ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
हे ही वाचा:
आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत
इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड
नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!
ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ
आम्ही केवळ तीन जागा मागितल्या आहेत, इतर ठिकाणांबाबत कोणताही वाद नाही, असे स्पष्ट करताना राजकीय हट्टीपणा आणि व्होटबँकेच्या राजकारणामुळे वाद होतात, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.