29 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरविशेषदिल्लीचा दिमाखदार विजय

दिल्लीचा दिमाखदार विजय

Google News Follow

Related

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात एक आगळीवेगळी लढत पाहायला मिळाली. आयपीएलचा सगळ्यात जेष्ठ कर्णधार विरुद्ध वयाने सगळ्यात लहान कर्णधार अशी ही लढत होती. त्यात दोघेही यष्टीरक्षक. हा सामना रंगला महेंद्र सिंह धोनी याच्या चेन्नई संघात आणि रिषभ पंत याच्या दिल्ली संघात. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर अगदी सहज मात केली आहे. दिल्लीने ७ गडी राखून चेन्नईचा पराभव केला आहे.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८८ इतकी धावसंख्या उभारली होती. चेन्नईकडून सुरेश रैनाने अर्धशतकीय खेळी करत चेन्नईच्या डावाला दिशा मिळवून दिली. त्याने ३६ चेंडूत ५४ धाव केल्या. त्याला मोईन अली या अष्टपैलू खेळाडूने चांगली साथ दिली त्याने २४ चेंडूत ३६ धाव केल्या. तर नंतर सॅम करन याने तुफान फटकेबाजी करत १५ चेंडूत ३४ धावा ठोकल्या.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका – भाजपा

विजयासाठी २० षटकांत १८९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाने सुरवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे या विजयाचे शिल्पकार ठरले. त्या दोघांनीही अर्धशतकीय खेळी करत पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शॉ याने ३८ चेंडूत ७२ धावा केल्या तर धवनने ५४ चेंडूत ८५ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा