24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरसंपादकीयलोकसंख्येचे गणित बदलणारा एक्स फॅक्टर बुलडोझर इथेही वळवा...

लोकसंख्येचे गणित बदलणारा एक्स फॅक्टर बुलडोझर इथेही वळवा…

फेरीवाल्यांच्या माध्यमातून मुंबईच्या हिंदुबहुल भागांत लोकसंख्येचे गणित बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.

Google News Follow

Related

जुनागडमध्ये हिंदूविरोधी गऱळ ओकणाऱ्या मुफ्ती सलमान अझहरीच्या गुजरात एटीएसने मुंबईत येऊन मुसक्या आवळल्या. सागर पार्कमधील राहत्या घरातून त्याला अटक झाल्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. मोठ्या संख्येने तिथे जमाव एकत्र झाला. कट्टरवाद्यांनी दगडफेक केली, एलबीएस रोड बंद केला. हे सगळं मुंब्र्यात नाही तर हिंदुबहुल घाटकोपरमध्ये घडले. मुंबईतील हिंदू बहुल भागात लोकसंख्येचे गणित बदलणारा एक एक्स फॅक्टर काम करतो आहे. गृहमंत्रालयाने त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

घाटकोपरमध्ये अझहरीच्या अटकेपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाई झाली होती. तेव्हाही असाच तणाव निर्माण झाला होता. घाटकोपरमध्ये जे काही घडले त्याचा फेरीवाल्यांशी काही संबंध आहे का ? कुठून येतात हे फेरीवाले, कोण आहेत हे? मुंबईच्या लोकसंख्येचा समतोल त्यांच्यामुळे बिघडतोय का? हिंदू कुत्तो का वक्त आया है, हमारा दौर आयेगा असा हा अझहरी बरळला होता. गुजरातमध्ये त्याने हे वक्तव्य केले होते. गुजरात पोलिसांनी त्याची गठडी वळली. तिथे आता त्याचा व्यवस्थित कार्यक्रम होत असेल. घाटकोपरमध्ये झालेली दगडफेक गंभीर मामला आहे. हे जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्र्यात किंवा साकीब नाचणच्या पडघ्यात घडू शकते, परंतु घाटकोपरमध्ये हे कसे घडले?

पोलिस सागर पार्क मधल्या त्याच्या घरी धडकले तेव्हा याने दीड तास दार उघडले नाही. या दरम्यान त्याने कित्येक लोकांना फोन केला. त्यामुळे मुंब्र्यापासून कुर्ल्याच्या कसाईवाड्यापर्यंत अनेकांनी तिथे धाव घेतली. अझहरीच्या अटकेनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यासमोर हजार लोकांचा जमाव एकत्र व्हावा हा काही योगायोग नाही. पोलिस ठाण्याच्या बाजूला आझाद नगर, अमृत नगर, नारायण नगर, संजय नगर या मुस्लीम बहुल वस्त्या आहेत. तिथूनही लोक आले होते.

फेरीवाल्यांच्या माध्यमातून मुंबईच्या हिंदुबहुल भागांत लोकसंख्येचे गणित बदलण्याचा प्रयत्न होतो आहे. ज्यांनी त्यांच्यावर कारावई करायला हवी असे लोक मुठभर पैशासाठी बघ्याची भूमिका घेऊन हा तमाशा होऊ देतायत. घाटकोपरमध्ये झालेल्या फेरीवाल्यांच्या सुळसुळाटामुळे त्रासलेल्या लोकांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सह्यांची मोहीम हाती घेतली होती. न्यायालयात जाण्याची तयारीही केली होती.

घाटकोपरमध्ये मुंब्रा, विक्रोळी पार्कसाईट, कुर्ला कसाईवाडा भागातील फेरीवाल्यांनी घुसखोरी केली आहे. हे फेरीवाले मुस्लीम आहेत. हे सांगायला नको. संघटीतपणे काम करायचे. घाऊक प्रमाणात माल घ्यायचा, स्थानिक फेरीवाल्यांपेक्षा कमी दराने विकायचा, अशी त्यांची कार्य पद्धती आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे प्रयोग सुरू आहेत. कमी दराने सामान विकले की स्थानिक फेरीवाल्याचा बाजार उठतो.

हे ही वाचा:

घड्याळ आणि राष्ट्रवादी अजितदादांकडे, शरद पवारांनी नाव व चिन्ह गमावले

राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेले बिस्किट दिल्याने हंगामा

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

निवृत्त सैनिक बनला होता लष्करचा दहशतवादी, दिल्लीतून अटक!

पोलिस आणि पालिकेला इतरांपेक्षा जास्त हफ्ते द्यायचे. दादरसारख्या भागात इमारतीसमोरच्या फूटपाथला फेरीवाल्यामागे जिथे शंभर दोनशे रुपये दिवसाला मोजले जायचे तिथे आज आठशे ते हजार रुपये मोजले जातात. पाठीशी कोणी तरी असल्याशिवाय हे घडत नाही. आता इतका पैसा मिळाल्यावर मराठी फेरीवाल्यांना कोण जागा देणार?

दादरमध्ये कधी काळी इथे फक्त मराठी फेरीवाले होते. आज मोठ्या संख्येने मुस्लीम फेरीवाले दिसतात. शिवाजी पार्कला तर फेरीवाल्यांचा वेढा पडलेला आहे. इथे शोरमाच्या गाड्या, स्टॉल अवतरले आहेत. यांचा माज इतका वाढला आहे की कबुतरखान्या जवळ असलेल्या राम मंदीराबाहेर शोरमाचा स्टॉल लावण्यात आला आहे. पालिकेचे अधिकारी इथून वसूली करतात. राजकीय पक्षाचे पदाधिकारी वसूली करतात. तोंडात पैशाचा तोबारा भरल्यामुळे स्थानिक नागरीकांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले जाते.

स्वस्त माल देऊन अनेक बाजार यांनी काबीज केलेले आहेत. या फेरीवाल्यांची झोपण्याची व्यवस्था मशीदीत केली जाते. अनेक जण गाड्यांवरच रात्र काढतात. बाकी सकाळचे कार्यक्रम करण्यासाठी सुलभ शौचालये आहेतच. शिवाजी पार्कपासून माहीम-वांद्र्यापर्यंत पसरले आहेत. सर्व प्रकारच्या मुस्लीम फेरीवाल्यांसाठी घाऊक माल, गाड्या पुरवण्याची व्यवस्था करणारे काही लोक आहेत. महापालिकेची तोंडदेखली कारवाई होते तेव्हा दरबार हॉटेलच्या बाजूला असलेल्या अहमद उमद इमारतीत सगळे फेरीवाले शिरतात, त्यांचा माल वाचवतात.

आज पालिकेचे अधिकारी, पोलिस आणि स्थानिक राजकारणी पैशांसाठी मुंबईच्या लोकसंख्येचे गणित बदलण्याचे काम करीत आहेत. मराठी आणि अन्य भाषिक हिंदू फेरीवाले संघटीत नसल्यामुळे त्यांच्यावर मात्र पालिकेचे अधिकारी दादागिरी करताना दिसतात. लोकांनी तक्रारी केल्या तर फेरीवाल्यांना हटवणे आमचे काम नाही, असे पोलिस सांगतात, पालिकेचे अधिकारी सांगतात की आम्हाला पोलिस संरक्षण देत नाहीत. हफ्ते खायला मात्र दोघेही असतात. एकदा दुकानदारी स्थिरस्थावर झाली की जवळच्या झोपडपट्टीत काही काळानंतर मुक्कामही ठोकता येतो.

घाटकोपर पोलिस ठाण्यात जेव्हा हा अझहरीचा राडा सुरू होता तेव्हा काँग्रेसचे नसीम खान आणि एमआयएमचे वारीस पठाण हे दोन नेते तिथे दाखल झाले. ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, असे पोलिसांचेही म्हणणे आहे. त्यामुळे दगडफेक प्रकरणात ज्या १९ जणांची नावे आरोपी म्हणून पोलिसांनी एफआय़आऱमध्ये नोंदवली आहेत, त्यात या दोघा नेत्यांची नावे नाहीत. परंतु त्याच्या सोबत जो जमाव आला होता तो मात्र पोलिसांच्या विरोधात असलेल्या जमावात सामील झाला.

 

दोन दिवसांपूर्वी भाजपा नेते नीतेश राणे यांनी मुंबईतील रोहींग्या आणि बांगलादेशींबाबत इशारा दिला होता. राणे जे बोलले त्याचे गांभीर्य खोलात जाऊन समजून घ्यायचे असेल तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात, बाजारात पसरत चाललेल्या फेऱ्यावाल्यांच्या मूळापर्यंत जाण्याची गरज आहे. एखादी देखणी घरंदाज महीला या फेरीवाल्यांसमोरून जाते तेव्हा क्या माल है, धमाल है… असे म्हणत खिदळण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. विनयभंगाचे हे प्रकार सर्रास घडतात. यांना वेळीच आवरले नाही तर मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेचे १२ वाजणार हे निश्चित. महानगर पालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांचाही त्यांच्यासोबत हिशोब करण्याची गरज आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुलडोझर इथेही वळवण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा