31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषसंसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार...!

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज परंतु त्यातही काँग्रेस अपयशी, पंतप्रधान मोदी

Google News Follow

Related

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत उत्तर दिले.पंतप्रधान मोदींनी भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि विरोधी पक्ष म्हणून स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे. मात्र, यामध्ये काँग्रेस अपयशी ठरली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान मोदींनी दावा केला की, यावेळी भाजपने ३७०चा आकडा पार केला तर एनडीएच्या खात्यात ४०० हुन अधिक जागा जमा होतील.

मल्लिकार्जुन खर्गे देखील म्हणाले भाजप ४०० चा आकडा पार करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आमच्या सरकारचा तिसरा टप्पा सुरू व्हायला फार दिवस उरलेले नाहीत. आता फक्त १००-१२५ दिवस उरले आहेत. भाजपा नक्कीच ३७० पेक्षा जास्त जागा जिंकेल. ते पुढे म्हणाले, “संपूर्ण देश म्हणत आहे की, यावेळी भाजप ४०० पार करेल, मल्लिकार्जुन खर्गे देखील सांगत आहेत की, भाजप ४०० पार करेल.यावेळी जनता भारतीय जनता पक्षाला (भाजप) ३७० जागा मिळाल्या तर एनडीएचा आकडा ४०० हुन अधिक होईल.तसेच आमची सरकार तिसऱ्या टर्ममध्ये खूप मोठे निर्णय घेणार आहे.

हेही वाचा..

“विरोधक पुढील निवडणुकीनंतर दर्शक गॅलरीत दिसतील”

ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!

हात नका लावू माझ्या दाढीला…

निवडणूक प्रचारात, रॅलीत लहान मुलांना घोषणा द्यायला लावल्यास कारवाई

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आता निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली
विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडू शकली नाही आणि इतर विरोधी पक्षांनाही पुढे जाण्याची संधी दिली नाही. ते पुढे म्हणाले की, विरोधी बाकावर दीर्घकाळ राहण्याचा जो संकल्प विरोधी पक्षाने हाती घेतला आहे त्याचे मी खूप कौतुक करतो आणि त्यांच्या भाषणाने या संकल्पाची पुष्टी झाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आता निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली आहे, गेल्या वेळी काहींनी जागा बदलल्या होत्या आणि यावेळीही बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.अनेकांनी आता लोकसभेऐवजी राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.भारतीय जनता पक्षाच्या सरकारची उद्दिष्टे किती मोठी आहेत, आमची हिम्मत किती मोठी आहे हे सारे जग पाहत आहे.ते पुढे म्हणाले की, एक म्हण आहे जी काँग्रेसला पूर्णपणे शोभते ती म्हणजे, “नौ दिन चले ढाई कोस”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशात ज्याप्रमाणे काम चालू आहे त्याचा विचारही काँग्रेस करू शकत नाही
आपल्या सरकारच्या कामाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे त्याची कल्पनाही काँग्रेस सरकार करू शकत नाही. आम्ही गरीबांसाठी ४ कोटी घरे बांधली, त्यापैकी ८० लाख पक्की घरे शहरी गरिबांसाठी बांधली.काँग्रेसच्या गतीने हे काम झाले असते तर एवढे काम पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती आणि १०० पिढ्या निघून गेल्या असत्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा