पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ललित कला केंद्रातर्फे काही दिवसांपूर्वी ‘जब वी मेट’ हे नाटक सादर करण्यात आले होते.या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी हास्यास्पद डायलॉग होते.यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संताप व्यक्त करत ललित कला केंद्राची तोडफोड करत कलाकारांना मारहाण केली.या घटनेमुळे राज्यातील अनेक कलाकारांनी निषेध केला आणि काहींनी समर्थन देखील केले.या प्रकरणात अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा अशी मागणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी यांनी केली आहे.लेखक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट करत प्रशांत दामलेंकडे मागणी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या नाटकवरून हा वाद सुरु झाला.या नाटकात प्रभू श्रीराम आणि सीता यांचा अपमान केला असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.त्यानंतर कार्यकर्त्यांनी नाटकात गोंधळ घालत नाटकातील कलाकारांना मारहाण केली व कला केंद्राची तोडफोड केली.धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकरणी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली.नाटकातील कलाकारांना मारहाण केल्याप्रकरणी अनेक कलाकारांनी निषेध दर्शवत प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा..
निवडणूक प्रचारात, रॅलीत लहान मुलांना घोषणा द्यायला लावल्यास कारवाई
१९९१ चा उपासना कायदा रद्द करण्याची मागणी
पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!
घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!
या प्रकरणावर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि अभिनेते प्रशांत दामलेंना विनंती केली. सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, श्री प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि लोकप्रिय जेष्ठ कलावंत या नात्याने ललित कला केंद्रात जाऊन दोन्ही गटांशी बोलून त्यातील तथ्य जाणून ABVP च्या कार्यकर्त्यांना लोककला या प्रकाराची माहिती देऊन..गैरसमज कमी करून एकोपा निर्माण करणे आणि कलावंतांना निर्भय वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे.. तरच अखिल भारतीय नाट्य परिषदेला मातृ संस्था म्हणता येईल .. श्री दामले यांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने तोडगा काढावा ही विनंती आणि अपेक्षा.., असे सचिन गोस्वामी यांनी म्हटले आहे.