पंतप्रधान मोदी सरकाराच्या जाहिरातीवर काळे फासणे काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना महागात पडल आहे.कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत.कुणाल राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलन करून सरकारच्या बॅनरला काळे फासले होते.या प्रकरणी कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकसित भारत संकल्पना यात्रेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता नागपूर जिल्हा परिषदेसमोर बॅनर लावण्यात आले होते.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी शनिवारी आपल्या २० ते २५ समर्थकांसह जिल्हा परिषदेसमोर लावण्यात आलेल्या सरकारच्या जाहिरातीवर काळं फासलं होतं.
हे ही वाचा:
राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!
पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, १० पोलीस ठार तर ६ जखमी!
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
सरकारी योजनांच्या नावाखाली पंतप्रधान मोदी स्वतःचा आणि भाजपाचा प्रचार करीत असल्याचा आरोपी त्यांनी त्यावेळी केला.जाहिरातीवर पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला काळं फासण्यात आले.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांकडून कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांकडून कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं.परंतु, कुणाल राऊत हे पोलीस ठाण्यात उपस्थित राहू शकले नाहीत.अखेर पोलिसांनी कुणाल राऊतला रविवारी ताब्यात घेतलं.कुणाल राऊत कुही परिसरातून जनसंवाद यात्रेवर निघाले असता पोलिसांनी त्यांना अटक केली.