पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत.पंरतु, राहुल गांधी केवळ देशाचे नुकसान करत आहेत.तसेच राहुल गांधी गंभीर नेता नाहीयेत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.’न्यूज १८’ च्या ‘चौपाल’ या कार्यक्रम ते बोलत होते. या कार्यक्रमात देशातील प्रथा आणि धोरणांवर प्रभाव टाकणारे सेलिब्रिटी आपले विचार मांडतात. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली होती.तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या बाबतीत आपले मत वक्त केले.
देशाची प्रगती मोदींमुळेच शक्य
सुरुवातीला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अनके प्रश्नांची उत्तरे दिली.त्यानंतर देशाच्या वाढत्या प्रगतीवर बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे आणि हे पंतप्रधान मोदींमुळे घडले आहे. आज आपण सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत.२०४७ पर्यंत भारत देश एक विकसित देश बनेल.देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.ते एक रॉकस्टार आहेत, असे मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.मंत्री रिजिजू यांनी कार्यक्रमात विरोधी आघाडीवर देखील जोरदार हल्ला चढवला.ते म्हणाले की, जर कोणी देशाच्या विरोधात काम करत असेल तर आम्हाला बोलावे लागले.इंडी आघाडीमध्ये सतत फूट पडत असल्याचे दिसत आहे, असे मंत्री रिजिजू म्हणाले.
हे ही वाचा:
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीला!
उत्तराखंड मंत्रिमंडळाची समान नागरी कायद्यावर मोहोर
राहुल गांधींवर हल्ला
न्यूज १८ च्या ‘चौपाल’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रिजिजू म्हणाले की, ‘राहुल गांधी देशाचे नुकसान करण्यासाठीच प्रवास करत आहेत. चिथावणी देण्याचे ते काम करत आहरेत. परदेशात जाऊन ते देशाविरुद्ध बोलण्याचे काम करत असतात.चीन किंवा सुरक्षेबद्दल संभ्रम पसरवणे किंवा खोटे बोलण्याचे काम ते करत असतात. त्यांची ही सर्व कामे गुन्ह्याच्या श्रेणीत येणारी आहेत.
राहुल गांधी हे गंभीर नेते नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राहुल गांधी दौऱ्यावर आहेत, केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले.
केजरीवाल हे भ्रष्टमाणूस
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी इंडी आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सोडले नाही. केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘मी केजरीवाल यांच्यासारखा भ्रष्ट माणूस पाहिला नाही. केजरीवाल सारख्या माणसाला कोणी सहन करू शकते का? आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा ते मुख्यमंत्री असतात…बोलतातही उत्तम.पंरतु जेव्हा तुम्ही खोलीतून बाहेर पडता तेव्हा ते मीडियासमोर येतात… एवढे पण कोण खोटे बोलते?, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.