उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी मॉस्कोमध्ये भारतीय दूतावासात काम करणाऱ्या सतेंद्र सिवाल याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) मेरठ शाखेने आरोपी सतेंद्र सिवाल याला चौकशीसाठी बोलावले होते. सतेंद्र हा सन २०२१मध्ये मॉस्कोतील भारतीय दूतावासात आयबीएसए (इंडियाबेस्ड सिक्युरिटी असिस्टंट) पदावर कार्यरत होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला दमात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
आयएसआयला भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य संस्थांची गुप्त माहिती दिल्याचा आरोप सतेंद्रवर आहे. तसेच, तो आयएसआयच्या सूचनेनुसार, परराष्ट्र विभागातील कर्मचाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून किंवा पैशांचे आमिष दाखवून गुप्त माहिती देत असे, असेही समजते. त्याला अटक केल्यानंतर लखनऊला एटीएसच्या मुख्यालयात नेले जात आहे. तेथील चौकशीत केंद्रीय तपास संस्थाही सहभागी होण्याची शक्यता आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोमध्ये तैनात असताना सतेंद्र सिवाल फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला होता. त्याने सुरुवातीला मेसेंजरच्या माध्यमातून तिच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा:
‘ग्रॅमी’वर भारतीयांची मोहोर; झाकीर हुसैन यांचा तीन तर, राकेश चौरासियांचा दोन ग्रॅमीने गौरव
द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मोपदेशक ताब्यात!
जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!
‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!
त्यानंतर एकमेकांच्या मोबाइल नंबरची देवाणघेवाण झाल्यानंतर ते व्हॉट्सअपवर एकमेकांशी बोलू लागले. फेसबुकवर तिचे नाव पूजा लिहिले होते. तिने स्वतः रिसर्चर असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तिने तिच्या संशोधनासाठी काही माहिती हवी असल्याचे सांगितले होते. इथेच तो तिच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर गुप्त माहितीच्या बदल्यात त्याला पैशांची लालूचही दाखवण्यात आली होती. त्याच्या लोभाने त्याने अनेक गुप्त माहिती तिला कळवल्याचे सांगितले जात आहे.