संगीत क्षेत्रातील नामांकित ग्रॅमी पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या पुरस्कारामध्ये भारतीय संगीतकारांनी बाजी मारली आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या अल्बमने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. शक्ती बँडमधील कलाकारांना यावेळी ग्रॅमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या बँडने धिस मुव्हमेंट नावाचे गाणे कंपोझ केले होते. या गाण्याला यावेळी ग्रॅमीने सन्मानित करण्यात आले आहे.
गिटारिस्ट जॉन मॅकलॉग्लिन, उस्ताद झाकीर हुसेन, गायक शंकर महादेवन, तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिनिस्ट गणेश राजगोपालन यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ग्रॅमी पुरस्कारावर भारतीय संगीतकार, वादक आणि गायक यांनी मोहोर उमटवल्यानंतर भारतीय संगीतप्रेमी, श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्रॅमी जिंकल्यानंतर सोशल मीडियावरुन विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शक्ती बँडला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटगिरीमधून पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्याला जगभरातील मान्यवर संगीतकार, गायक, वादक उपस्थित होते. झाकीर यांना त्यांच्या पाश्तो नावाच्या अल्बमसाठी गौरविण्यात आले. त्यात त्यांच्यासोबत बेला फ्लेक, एडगर मेयर, बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचा समावेश होता. शंकर महादेवन यांच्या धिस मुव्हमेंटमध्ये देखील झाकीर यांना पुरस्कार मिळाला. यंदा त्यांना तीन ग्रॅमी मिळाले असून राकेश चौरासिया यांना देखील दोन ग्रॅमीनं गौरविण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला ‘बनावट’ विवाह!
इतके दिवस ‘वरिष्ठां’चे ऐकलेत, आता माझे ऐका!
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार
धिस मुव्हमेंट अल्बलमध्ये काय आहे?
या अल्बमच्या माध्यमातून प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली आहे. शक्तीचा प्रेरणास्त्रोत संगीत आहे. तो कशाप्रकारे या शक्तीला प्रेरित करतो हे त्या अल्बमच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.