‘भारत माता की जय’च्या घोषणेस नकार देणाऱ्या लोकांवर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी टीका केली आणि संताप व्यक्त केला.केरळच्या कोझिकोड येथील शनिवारी एका युवा संमेलनात केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी संबोधित करीत असताना हा प्रकार घडला.या संमेलनात केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘भारत माता की जय’ ची घोषणा देण्यास सांगतले.परंतु, संमेलनातील काही लोंकानी घोषणाबाजी देण्यास नकार दिला.यावर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी टीका करत संताप व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी घोषणेस नकार देणाऱ्या जनतेला विचारले की, भारत तुमची आई नाहीये का?.तसेच मिनाक्षी लेखी यांनी घोषणा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका महिलेला घटनास्थळ सोडून जाण्यास सांगितले.दक्षिणपंथी संघटनेकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी संमेलनाला संबोधत करीत होत्या.भाषणाचा समारोप करताना मीनाक्षी लेखी ‘भारत माता की जय’ चा नारा दिला आणि श्रोत्यांना पुन्हा नारा देण्यास सांगितले.परंतु, प्रेक्षकांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लोकांना विचारले की, भारत हे तुमचे घर नाही का? “भारत फक्त माझी आई का आहे? की तुमचीही आहे?काही शंका आहे का?..उत्साह व्यक्त करणे आवश्यक आहे,” असे मीनाक्षी लेखी म्हणाल्या.
हे ही वाचा:
संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत
आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब
आडवाणीजींना भारतरत्न देण्याची घोषणा आनंददायी
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’
Proud of Meenakshi Lekhi, who threw that Mallu lady out, who was not ready to chant Bharat Mata ki Jai.
यदि भारत में रहना होगा, भारत माता कि जय कहना होगा
— AParajit Bharat 🇮🇳 (@AparBharat) February 4, 2024
मंत्री मीनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली.पंरतु, तेव्हाही लोकांकडून प्रतिसाद कमी मिळला.त्या म्हणाल्या की, डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही कमी आहे.त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांमधील एका महिलेकडे बोट दाखवत लेखी म्हणाल्या की, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिला, आपण उभे राहा.इकडे तिकडे पाहू नका, मी तुमच्याशी बोलतेय, मी तुम्हाला सरळ विचारते भारत तुमची आई नाहीय का? हा अॅटीट्युड का, असे मीनाक्षी लेखी म्हणाल्या.
त्यानंतर मीनाक्षी लेखी यांनी पुन्हा भारत माता की जयचा नारा दिला.परंतु, त्या महिलेने नार देण्यास नकार दिला आणि शांत पणे उभे राहिली.यावर मीनाक्षी लेखी संतापल्या आणि त्या महिलेस तेथून निघून जाण्यास सांगितले.’ज्याला राष्ट्राचा अभिमान वाटत नाही’ आणि ज्याला भारताबद्दल बोलणे लाजिरवाणे वाटते, अशा व्यक्तीने युवा संमेलनात सहभाग घेण्याची गरज नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.