24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामासंजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत

संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत

मालेगाव न्यायालयाने संजय राऊतांना फटकारले

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मालेगावमधील गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांच्यावर १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान, न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देत दिलासा दिला होता. परंतु, शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी संजय राऊत नियमित सुनावणीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.

मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्याची सुनावणी शनिवारी होती. परंतु, या सुनावणीला संजय राऊत गैरहजर राहिले. मंत्री दादा भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. त्यामुळे संजय राऊतांच्या गैरहजर राहिल्यामुळे न्यायलयाने नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत, या शब्दांत न्यायालयाने संजय राऊतांना त्यांच्या वकिलामार्फत सुनावले आहे.

प्रकरण काय?

‘सामना’ या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

हे ही वाचा:

राम मंदिराला ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी

मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

२३ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यावेळी ते दसरा मेळाव्याचे कारण देत गैरहजर राहिले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यावेळेसही ते हजर राहिले नाहीत. या प्रकरणात २ डिसेंबरला संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन दिला होता. पण, आता पुन्हा राऊत सुनावणीस हजर राहिले नाहीत. यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची न्यायालयास विनंती करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले आहे. दादा भुसे यांच्या वतीने ऍड. सुधीर अक्कर हे काम पाहत आहेत तर खासदार राऊत यांच्याकडून ऍड. मधुकर काळे काम पाहत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा