31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामापश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं आहे. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या १८ वर्षीय तरुणाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे. मतदान शांततेत पार पडावं म्हणून तैनात असलेल्या सीआयएसएपच्या जवानांचे शस्त्र हिसकावून घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे.

सीआयएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. पाचही मृतदेह माथाभांगा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवालही मागवला आहे. मात्र, आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार सीआएसएफच्या जवानांनी गोळीबार केल्याने त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून शीतलकुचीमधील गोळीबाराची माहिती घेतली आहे. तसेच गोळीबार करण्यात आला तेव्हा काय परिस्थिती होती, गोळीबार का करावा लागला, गोळीबार करणं गरजेचं होतं का? याबाबतची माहिती जैन यांनी मागितली आहे. तसेच घटनास्थळाची व्हिडीओ रेकॉर्डिंगही मागवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

राज्यातील हावडा, दक्षिण २४ परगना, हुगली, कुचबिहार आणि अलीपुरद्वार या पाच जिल्ह्यातील ४४ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात एकूण १५ हजार ९४० पोलिंग बूथ आहेत. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झालं असून संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत असणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १,१५,८१,०२२ मतदार या उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा