आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर साऊथ चित्रपटातील सुपरस्टार अभिनेता थलपथी विजय याने राजकारणात प्रवेश केला आहे.थलपथी विजय यांनी ‘तमिझगा वेत्री कळघम’ या नवीन पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री केली आहे.तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार थलपथी विजय यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षाची नोंदणी झाली असून येणाऱ्या २०२६ ची विधानसभा निवणुकीत निवडणूक लढवू!
अभिनेता थलपथी विजय यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली.अभिनेता विजय निवेदनात म्हटले आहे की, ‘पक्षाची नोंदणी ईसीआयकडे करण्यात आली आहे. मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा आमचा पक्ष निवडणूक लढणार नाही तसेच अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे पक्षाच्या कार्यकारी समितीने निर्णय घेतल्याचे अभिनेता थलपथी विजय यांनी सांगितले.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकार!
अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!
अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिचे कर्करोगाने निधन
वर्षभरात काही सिद्ध न झाल्यास जप्त केली मालमत्ता परत करा!
अभिनेते विजय निवेदनात म्हटले आहे की, राजकारण हा व्यवसाय नसून एक ‘पवित्र जनसेवा’ आहे.आमच्या पक्षाचे नाव ‘तमिझगा वेत्री कळघम’ असून याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पक्ष’ असा आहे.विजय यांच्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.दरम्यान, अभिनेता थलपथी विजय राजकारणात येण्याची शक्यता काही काळ वर्तवली जात होती.अखेर अभिनेत्याने स्वतःचा पक्षाची घोषणा करत राजकारणात प्रवेश केला आहे.यापूर्वी तामिळनाडूमध्ये अनेकांनी अभिनयाच्या दुनियेतून राजकारणात प्रवेश केला आहे.यामध्ये सर्वात पहिले एम.जी. रामचंद्रन आणि जे. या जयललिता यांचे नाव लागते.