अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध योजनांसह लखपती दीदी योजनेसाठीही मोठी घोषणा करण्यात आली.लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.आतापर्यंत देशातील एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून आता ३ कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लखपती दीदी योजनेबद्दल सांगितले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाषणात म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.आतापर्यंत देशातील एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी योजने’चा लाभ मिळाला आहे.सुरुवातीला २ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र आता ते ३ कोटी करण्यात आहे आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अटक झालेले सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री
१० वर्षात अर्थव्यवस्थेत विकास, पंतप्रधान मोदींमुळे प्रगती,पंतप्रधान मोदींचा जय अनुसंधानचा नारा!
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर ईडीचा छापा!
बूट फाटल्यामुळे नातेवाइकाचे लग्न हुकले; वकील ग्राहकाची दुकानदाराला नोटीस
काय आहे लखपती दीदी योजना?
महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली.या योजनेंतर्गत बचतगटाशी सलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्यांच प्रशिक्षण दिले जाते.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गतमहिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन चालवणे विविध यंत्र दुरुस्ती अश्या प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल.तसेच या योजनेद्वारे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील.