उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथील एका दुकानदाराकडून खरेदी केलेले बूट फाटल्यामुळे ग्यानेंद्र भान त्रिपाठी याने त्या दुकानदारालाच नोटीस पाठवली आहे. हे बूट फाटल्यामुळे तो त्याच्या मेहुण्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे त्याला मानसिक ताण येऊन त्याच्यावर कानपूर येथील रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली, असा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे.
त्रिपाठी हे स्वतः पेशाने वकील आहेत. त्यांनी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सलमान हुसैन यांच्या दुकानातून बुटांची खरेदी केली होती, असा दावा केला आहे. तेव्हा दुकानदाराने हे बूट नामांकित ब्रँडचे असल्याचे सांगत सहा महिन्यांची वॉरंटी असल्याचेही नमूद केले होते, असा दावा केला. मात्र ते बूट अवघ्या सहा दिवसांत फाटले, असा दावा त्रिपाठी यांनी केला आहे. हे बूट फाटल्यामुळे त्यांना त्यांच्या मेहुण्याच्या लग्नाला हजर राहता आले नाही, असेही म्हटले आहे. त्यामुळे त्यांना खूप मानसिक ताण आला आणि कानपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांना उपचार करावे लागले, असा दावा त्रिपाठी यांनी केला.
त्यांनी या प्रकरणी १९ जानेवारी रोजी दुकानदाराला नोटीस पाठवली आहे. दुकानदाराने त्यांना उपचारासाठी खर्च करावे लागलेले १० हजार रुपये, रजिस्ट्री करण्यासाठी लागलेले २१०० रुपये तसेच, बुटाचे १२०० रुपये परत देण्याची मागणी या नोटिशीत केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास त्यांच्यावर खटला दाखल केला जाईल, असा इशाराही या वकिलाने दुकानदाराला दिला आहे.
हे ही वाचा:
मोठी घोषणा! ४० हजार सामान्य बोगी आता वंदे भारतप्रमाणे
अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आशा, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार
“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”
“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”
दुकानदार सलमान हुसैन यांनी त्रिपाठी यांनी आपल्या दुकानातून बूट खरेदी केल्याचा दावा मान्य केला आहे. मात्र, आपण त्यांना बूट नामांकित ब्रँडचे आहेत, असे सांगितल्याचा वकिलाने केलेला दावा फेटाळून लावला आहे. त्रिपाठी यांनी ५० टक्के सवलतीत हे बूट खरेदी केल्याचा दावाही हुसैन यांनी केला. ‘बुटाचा सोल सहा महिन्यांत खराब होणार नाही, अशी गॅरंटी देण्यात आली होती, परंतु काहीही झाले नाही. ते माझ्यावर बळजबरीने दबाव आणत आहेत आणि त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,’ असा दावा दुकानदाराने केला आहे.