देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग सहाव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, सबका साथ सबका विकास हे मोदी सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.
“गेल्या १० वर्षात जे काम केलंय त्या आधारावर देशातील जनता पुन्हा संधी देईल. देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले आहेत. देशातील ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिलं. शिवाय सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. देशातील २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीतून बाहेर काढण्यास यशस्वी ठरलो आहोत,” असं अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याचा आमचा प्रयत्न असून त्या दृष्टीनेचं गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, असंही त्या म्हणाल्या.
“जनतेच्या अन्नविषयक समस्या दूर केल्या आहेत. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. प्रत्येक घरात पाणी, वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे. भारत २०४७ पर्यंत नक्कीच विकसित राष्ट्र होईल,” असा विश्वास निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल
१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक
चक्रव्यूहातून सुटकेचा फक्त आभास…
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. जनहितार्थ काम सुरू केले आहे. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिले. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्रानेचं आम्ही पुढे जात आहोत, असंही निर्मला सीतारमण म्हणाल्या.