काँग्रेस पक्षाची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेवेळी राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
बुधवार, ३१ जानेवारी रोजी दुपारी मालदा येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहचली, त्यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी हे गाडीतून तात्काळ खाली उतरले. त्यावेळी त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजनही उपस्थित होते.
STORY | Rahul Gandhi's car 'pelted with stones' during Congress yatra in Bengal: Adhir Ranjan Chowdhury
READ: https://t.co/1gEDXZJJPY
VIDEO: pic.twitter.com/Mi44AqNeBq
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2024
पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही अराजकतावादी घटकांनी हा हल्ला केला आणि या अराजकतावादी घटकांचा सत्ताधारी पक्षाशी संबंध आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.”
अधीर रंजन म्हणाले की, “ज्यावेळी राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली त्यावेळी आतमध्येच होतो. पाठीमागून कुणीतरी दगड फेकून मारल्याचं दिसले. पण पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींना येण्यापासून अडवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये न्याय यात्रेनं प्रवेश केल्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
भारत जोडो न्याय यात्रेला पश्चिम बंगाल राज्य सरकारचा पाठींबा नाही. मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ज्या स्टेडियमवर रात्री मुक्कामी थांबणार होते, त्याचीही परवानगी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनेवरुन कट रचला जातोय असे वाटते, असं अधीर रंजन म्हणाले.
हे ही वाचा:
इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा, यावेळी पत्नीही शिक्षेस पात्र!
“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”
क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानातच पडला आजारी!
छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!
कॉंग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूर येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. या यात्रेत ६७ दिवसांत ६ हजार ७१३ किमीचे अंतर पार केले जाणार आहे. ही यात्रा १५ राज्यातील ११० जिल्ह्यांतून जाणार असून मुंबईत संपणार आहे.