मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्याच्या शाहपुरामध्ये उपविभागीय न्यायदंडाधिकारी महिला निशा नापित शर्मा यांच्या हत्येचे गूढ २४ तासांच्या आत उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी त्यांचे पती मनीष शर्मा यांना अटक केली आहे. पोलिसांनी चादर, उशी आणि वॉशिंग मशिनमध्ये सापडलेल्या कपड्यांच्या आधारे हे गूढ उकलले. निशा यांनी सर्व्हिस बूक, विमा आणि बँकखात्यामध्ये त्यांच्या पतीला नॉमिनी न केल्याबद्दल पतीने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
मनीष हे त्यांची पत्नी निशा यांना घेऊन सोमवारी रुग्णालयात घेऊन गेले होते. निशा यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र रुग्णालयात येण्याआधीच निशा यांचा मृत्यू झाला होता. निशा या उपविभागीय न्यायदंडाधिकारी असल्याने पोलिसांनी लगेचच तपासासाठी पथक स्थापन करून या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. गेल्या काही दिवसांपासून निशा यांची तब्येत बरी नसल्याचे मनीष यांनी पोलिस चौकशीत सांगितले. मात्र निशा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने सांगितले की, त्यांचा मृत्यू चार ते पाच तासांपूर्वीच झाला आहे.
हे ही वाचा:
ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी
‘स्थगिती, लांबलचक सुनावण्यांमुळे निकालांना उशीर’
सीबीआयकडून अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटेविरुद्ध गुन्हा दाखल
मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घराचा तपास केला. तेव्हा त्यांना एक चादर, उशी आणि वॉशिंग मशिनमध्ये निशा यांचे कपडे मिळाले. तेव्हा पुन्हा मनीष यांची चौकशी करून त्यांना दमात घेतल्यावर त्यांनी हत्येची कबुली दिली. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी मनीष याने निशा यांचे रक्ताने माखलेले कपडे, उशी आणि चादर वॉशिंग मशिनमध्ये धुण्यासाठी टाकले होते. निशा यांची हत्या केल्यानंतर मनीष त्यांच्या प्रेताच्या बाजूलाच सहा महिने बसून राहिले होते. निशा नापित (५१) आणि प्रॉपर्टी डिलर (४५) यांचा विवाह एका ऑनलाइन विवाह पोर्टलच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र त्यांच्यात सतत भांडणे होत असत.