एडनच्या आखातात व्यापारी जहाजावर पुन्हा हल्ला झाला आहे. येमेनच्या हुती बंडखोरांनी शुक्रवारी रात्री ब्रिटिश मालवाहू जहाजाला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे जहाजाला लागलेली आग विझवण्यासाठी आयएनएस विशाखापट्टणम ही विनाशिका अग्निशामक साहित्यासह येथे पोहोचली आणि त्यांनी जहाजाला लागलेली आग विझवली. या जहाजावर २२ भारतीय व एक बांगलादेशी खलाशी होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
‘संकटात सापडलेल्या व्यापारी जहाजाने विनंती केल्यावर आयएनएस विशाखापट्टणम, एडनच्या आखातात तैनात करण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. भारतीय नौदल व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी आणि समुद्रातील जीवनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे,’ असे भारतील नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.एमव्ही मार्लिन लुआंडा हे ब्रिटिश जहाज एडनच्या आखातामधून मार्गक्रमण करीत असताना २६ जानेवारीच्या रात्री इराणसमर्थित हुती दहशतवाद्यांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्र या मालवाहू जहाजावर डागले होते. त्यामुळे जहाजावर आग लागली. बचावासाठी जहाजाने तातडीने मदतीसाठी संदेश पाठवला.
हे ही वाचा:
कर्ज काढून मुलाचा मृतदेह मागवण्याची वेळ!
काशी विश्वनाथ मंदिरासह नागर शैलीत साकारले आहे ज्ञानवापी!
दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!
जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…
भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौका आधीपासूनच या भागात गस्त घालत आहेत. जहाजाचा मदतीचा संदेश आला त्यावेळी आयएनएस विशाखापट्टणम ही विनाशिका श्रेणीतील गाईडेड क्षेपणास्त्र युद्धनौका त्याच भागात होती. संदेश येताच युद्धनौका तातडीने त्या ठिकाणी मदतीला रवाना झाली. अमेरिकेच्या युद्धनौकेनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.