28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरधर्म संस्कृती१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती

१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती

रामजन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपतराव यांच्याकडून कौतुक

Google News Follow

Related

द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स (सनातन धर्म हेच विज्ञानाचे मूळ) हे सनातन धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांवरील तसेच विज्ञानाचे खरे मूळ हे सनातन धर्मातच आहे हे सांगणारे पुस्तक अवघ्या १६ वर्षांच्या विवान कारुळकरने लिहिले आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनीही या पुस्तकाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या ३० मिनिटांतच संपली आहे हे विशेष.हे पुस्तक ॲमॅझॉनवर उपलब्ध आहे.

विवानच्या या प्रयत्नांत त्याचे आईवडील अर्थात कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे खूप मोठे पाठबळ आणि प्रोत्साहन आहे. पुस्तकाबाबत प्रशांत कारुळकर म्हणतात की, वेदांमध्ये अनेक वर्षांपूर्वी जे लिहून ठेवले तेच आजचे विज्ञान आहे. पण पश्चिमेच्या देशांमधील शास्त्रज्ञांनी आपणच हे सगळे शोधून काढल्याचा दावा नेहमी केला. प्रत्यक्षात त्या शोधाचे मूळ या वेदांमध्येच आहे. त्यावरच विवानने हे पुस्तक लिहिले असून त्यात अशी ४६ प्रकरणे समाविष्ट आहेत.

हे ही वाचा:

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला आठ कोटी ३३ लाख डॉलर देण्याचे डोनाल्ड ट्रम्पना आदेश

बिहारमध्ये राजकीय पट पालटणार? नितीश कुमार सरकारकडून २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे

हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!

कारुळकर म्हणाले की, आमचे कुटुंब सनातन धर्मावर श्रद्धा असणारे आहेच पण या पुस्तकाच्या प्रेरणेमागे हेच एकमेव कारण नाही तर विवान १३ वर्षांचा असताना पृथ्वीच्या दिशेने जे लघुग्रह येतात, त्यांचा शोध कसा घेता येईल यासंदर्भात एक पेटंट घेतले होते. त्याचे इन प्रिन्सिपल पेटंट आलेले आहे. अंतिम पेटंट लवकरच मिळणार आहे. अशी विज्ञान आणि खगोलशास्त्र याची आवड असणाऱ्या विवानने गेल्या साडेतीन वर्षांच्या अथक मेहनतीतून हे पुस्तक लिहिले आहे.

कारुळकर म्हणतात की, वेदांमध्ये जी विज्ञानाविषयी जे लिहिले गेले आहे तोच आजच्या आधुनिक विज्ञानाचा खरा स्रोत आहे, एवढेच आम्हाला मांडायचे आहे. कारुळकर यांनी रामजन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचे आभारही मानले आहेत.तुम्ही विवानला प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. नव्या भारताचा नवा विचार मांडण्याचा प्रयत्न अशा पुस्तकांच्या माध्यमातून होतो आहे, असे सांगत कारुळकर यांनी ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध असून ते जरूर वाचावे असे आवाहनही केले आहे.भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून होणारे विश्वरूपदर्शन ही मुखपृष्ठाची संकल्पना सर्वांना खूप आवडली आहे.

The Sanatan Dharam: True Source of all Science https://amzn.eu/d/7y62His

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा