28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरदेश दुनियामोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!

मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!

माजी राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांच्याकडूनही शुभेच्छा

Google News Follow

Related

भारत आणि मालदीव दरम्यान सुरू असलेल्या राजनैतिक वादाकडे दुर्लक्ष करून मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारत आणि मालदीव यांच्यातील जुन्या मैत्रीची आठवण केली. यासोबतच मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनीही ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत-मालदीव संबंधांची आठवण करून देत मुइझू म्हणाले की, भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शुभेच्छा. राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आगामी काळात भारत आणि तेथील लोकांसाठी शांतता, प्रगती आणि समृद्धी कायम राहावी अशी आशाही व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष मोइझू यांनी दोन्ही देशांमधील शतकानुशतकांची मैत्री, परस्पर आदर आणि खोल भावना अधोरेखित केल्या.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांत अनोख्या कामगिरीची दखल पहिली महिला माहूत ते दिव्यांग कार्यकर्ता

भारताने पाकिस्तानसोबत नाणेफेक करून जिंकली होती राष्ट्रपती वापरत असलेली ‘बग्गी’

फ्रान्सच्या तुकडीत सहभागी असणारे सहा भारतीय कोण?

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

यासोबतच मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनीही ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील अतूट संबंध वाढवण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा