प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली महिला माहूत ते दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
पहिली महिला माहूत
माहूत म्हणजे पुरुष… या परंपरेने चालत आलेल्या समजाला छेद दिला तो पार्बती बारूआ यांनी. १४व्या वर्षीच माहूत म्हणून प्रवास सुरू करणाऱ्या पार्बती यांनी अनेक हत्तींचे जीवन वाचवण्यासाठी तसेच, त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘वैज्ञानिक पद्धती लागू करून मानव-हत्ती संघर्ष कमी करण्याच्या वचनबद्धतेसाठी त्या नेहमीच उभ्या राहिल्या आणि तीन राज्यांच्या सरकारांना जंगली हत्तींचा सामना करण्यासाठी आणि पकडण्यासाठी मदत केली,’ असे ‘हाथी की परी’ नावाच्या बरुआच्या उद्धरणात नमूद केले आहे.
आदिवासींसाठी झटणारा कार्यकर्ता
आर्थिक अडचणींशी झुंजतानाही जागेश्वर यादव यांनी आदिवासीबहुल छत्तीसगडमधील उपेक्षित बिरहोर आणि पहाडी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले. यादव यांनी जशपूरमध्ये स्थापन केलेल्या आश्रमाच्या माध्यमातून निरक्षरता आणि आदिवासींना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचे काम केले जाते. ‘बिरहोर के भाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यादव यांनी करोना साथीच्या आजारादरम्यान लसीकरणाची सुविधाही दिली. तसेच, बालमृत्यू कमी करण्यास मोलाची मदत केली.
सेराईकेलाच्या सहकारी
झारखंडच्या चामी मुर्मू, ज्यांना ‘सेराईकेलाच्या सहकारी’ असे नाव देण्यात आले आहे. सेराईकेला खरसावन जिल्ह्यात वनीकरणाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि ३० लाखांहून अधिक रोपे लावल्याबद्दल त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी मदत गट आणि रोजगार प्रदान करून ४० गावांमधील ३० हजारांहून अधिक महिलांना सशक्त केले आहे. ५२ वर्षीय मुर्मू यांनी अशक्तपणा आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी कार्यक्रमही सुरू केले आहेत. बेकायदा वृक्षतोड, लाकूड माफिया आणि नक्षल कारवायांच्या विरोधात त्यांनी नेहमीच धाडसाने लढा दिला आहे.
दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता
ट्रकच्या धडकेमुळे आलेल्या अर्धांगवायूनेही हरियाणाच्या गुरविंदर सिंग यांना बेघर, निराधार, महिला आणि अनाथांच्या भल्यासाठी काम करण्यापासून परावृत्त करू शकले नाही. ‘दिव्यांगजन की आशा’ या नावाने सिंग यांनी बाल संगोपन संस्थेची स्थापना केली असून यात ३०० मुले गुण्यागोविंदाने राहात आहेत. तर, सहा हजारांहून अधिक अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना मोफत रुग्णवाहिका सेवा प्रदान केली जाते.
अन्य पद्म पुरस्कार्थी
केरळच्या कासारगोड येथील भाताची लागवड करणारे शेतकरी सत्यनारायण बेलेरी यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ‘सीडिंग साठ्य’ नावाने ओळखले जाणारे बेलेरी यांनी ६५०हून अधिक पारंपरिक भाताच्या वाणांचे जतन करून ‘धान पिकाचे संरक्षक’ म्हणून उदयास आले. त्यांच्या नाविन्यपूर्ण ‘पॉलीबॅग पद्धती’द्वारे त्यांनी सुपारी, जायफळ आणि काळी मिरी यांच्या पारंपरिक बियांचे संवर्धन केले आहे. ५० वर्षांच्या बेलेरी यांना ‘राजकायमे’ तांदूळ सादर करण्याचे आणि कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादन वाढवण्याचे श्रेयही दिले जाते.
‘गाच दादू’ (बंगालीमध्ये गाच म्हणजे झाड) नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुखू माझी (७८) यांनी बंगालच्या पुरुलियातील ओसाड जमिनीवर पाच हजारांपेक्षा जास्त वड, आंबा आणि ब्लॅकबेरीची झाडे लावली… तेही दररोज त्यांच्या सायकलवरून प्रवास करताना. अंदमानमधील सेंद्रिय उत्पादक, इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या के. चेल्लमल यांना नारळ आणि खजुराचे नुकसान टाळण्यासाठी आणलेल्या नावीन्यपूर्ण आणि किफायतशीर उपायांसाठी ओळखले जाते. या ६९ वर्षीय महिला दरवर्षी २७ हजारांपेक्षा जास्त नारळांचे उत्पादन घेतात. त्यांनी दोन हेक्टर जागेवर नारळाची लागवड केली आहे.
मिझोराममधील सर्वात मोठे अनाथाश्रम चालवणाऱ्या संगथनकिमा, पारंपरिक वैद्यक व्यावसायिक हेमचंद मांझी, सुमारे १० हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा देणारे यानुंग जामोह लेगो, कर्नाटकमधील आदिवासी कार्यकर्ते सोमन्ना, संमिश्र एकात्मिक शेतीचा दृष्टीकोन विकसित करणारे सरबेश्वर बसुमातारी, भाजलेल्यांवर मोफत शस्त्रक्रिया करणारे प्रेमा धनराज, मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलीस जवानांना शौर्य पदके
महाराष्ट्रातील मंत्र्यांचा अयोध्या दौरा लांबणीवर ?
उदय देशपांडे यांच्या मेहनतीची दखल
मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी या खेळासाठी प्रचंड मेहनत आणि संघर्ष केलेला आहे. समर्थ व्यायाम मंदिराच्या माध्यमातून त्यांनी असंख्य मुलांना मल्लखांबाचे धडे दिलेच पण परदेशात मल्लखांब खेळ नेला तिथेही मल्लखांबाचे चाहते तयार केले. याच माध्यमातून मल्लखांबाच्या वर्ल्डकपचे आयोजनही त्यांनी मुंबईत करून दाखविले. मल्लखांब प्रशिक्षक, खेळाचे उत्तम प्रशासक, शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्यांच्या या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आज त्यांनी दिलेली ही मल्लखांबाची दीक्षा घेऊन अनेक युवकांनी मल्लखांबाचा प्रसार करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मल्लखांब खेळ पोहोचू शकला आहे.
भारतातील सिकलसेल अनॅमिया नियंत्रण कार्यक्रमाच्या विकासाचा पाया रचणारे याझदी मानेकशा इटालिया यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसेच, गोदना चित्रकार शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, लोकगायक रतन कहार, टिकुली चित्रकार अशोक कुमार बिस्वास, लोकप्रिय कल्लूवाझी कथकली नृत्यांगना बालकृष्णन सदनम पुथिया वीटील, प्रथम महिला हरिकथा सांगणाऱ्या उमा महेश्वरी लेलनाथन गोकेनाथन डी., कृष्णलीला सांगणाऱ्या गंजम गोपिनाथ स्वेन, विणकर स्मृती रेखा चकमा, रंगमंच कलाकार ओमप्रकाश शर्मा, ज्येष्ठ तेय्यम लोकनर्तक नारायणन ईपी, लोकनर्तक भागबत पधान, प्रतिष्ठित शिल्पकार सनातन रुद्र पाल यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
नृत्यांगना वल्ली कुमारी, बद्रप्पन एम, बांबू कारागीर जॉर्डन लेपचा, मणिपूर कुंभार मच्छिहान सासा, रंगमंच कलाकार गद्दम सम्मैया, बेहरूपिया कलाकार जानकीलाल, बुरा वीणा वादक दसरी कोंडप्पा, पितळ मारोरी शिल्पकार बाबू राम यादव आणि छाऊ मुखवटा निर्माता नेपाळ चंद्र सुत्रधर यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.